शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अरुंधती जीपवर बसल्या तर, कोण दगडही उचलणार नाही - परेश रावल

By admin | Updated: May 25, 2017 16:56 IST

काश्मिरी युवकाऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधण्यासंबंधी मी केलेल्या टि्वटचा चुकीचा अर्थ काढण्यात आला.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 25 - काश्मिरी युवकाऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधण्यासंबंधी मी केलेल्या टि्वटचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी चिथावणी देतोय, हिंसाचार करण्याचा माझा उद्देश आहे असे आरोप माझ्यावर करण्यात आले. पण हे सर्व आरोप चुकीचे आहेत. 
 
उलट मी त्या टि्वटमधून शांती संदेश दिला. अरुंधती रॉय काश्मिरींच्या हिंतचिंतक आहेत. त्यांच्या विचारांचे समर्थन करतात. दगडफेक करणारे सुद्धा अरुंधती रॉय यांना मानतात. अरुंधती रॉय जीपवर बसल्या तर, कोणी दगडफेक करणार नाही किंवा दगड सुद्धा हाती उचलणार नाही. त्यामुळे हिंसाचाराचा प्रश्नच मिटेल. 
 
उलट अरुंधती रॉय तिथे गेल्या तर, आपले लष्कर किती प्रतिकुल परिस्थितीत काम करते हे त्यांना समजेल. जेएनयूच्या शहला राशिद आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी हिंसाचाराची भाषा केली. मी तर, शांतीचे कबुतर सोडले. अरुंधती रॉय तिथे गेल्या तर कोणी दगडफेक करणारच नाही असे मला म्हणायचे होते. पण माझ्या टि्वटचा चुकीचा अर्थ काढला असे परेश रावल यांनी सांगितले. 
 
देशाच्या प्रत्येक नागरीकाने लष्कराचे समर्थन केले पाहिजे. मी भाजपाचा खासदार असलो तरी त्याआधी देशाचा एक नागरीक आहे. उद्या मी खासदार नसलो तरी देशाचा नागरीक राहीन म्हणून मी लष्कराचे समर्थन केले असे परेश रावले म्हणाले. दरम्यान रावल यांचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं आहे. त्यांचं अकाऊंट पाहू शकतो, मात्र ते काही ट्विट करु शकत नाहीत. अरुंधती रॉय यांच्यासंबंधी ट्विट डिलीट केलं नाही तर त्यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात येईल अशी सूचना त्यांना ट्विटरकडून देण्यात आली होती. परेश रावल यांनी नकार दिल्यानंतर ट्विटरने ते ट्विट डिलीट करत अकाऊंट ब्लॉक केलं आहे. 
 
हे फक्त माझं एक ट्विटर अकाऊंट आहे, भारतीय पासपोर्ट नाही", असं परेश रावल बोलले आहे. मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाईटने आपल्याला अकाऊंट ब्लॉक करण्याची धमकी दिली होती असा दावा परेश रावल यांनी केला आहे.परेश रावल यांचं ते वादग्रस्त ट्विट सध्या त्याच्या अकाऊंटवर दिसत नाही आहे. यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, "मी अद्यापही माझ्या ट्विटवर ठाम आहे. मी माझं ट्विट डिलीट केलेलं नाही. ट्विटरने ते डिलीट केलं आहे". काश्मीरमध्ये ज्या अधिका-याने दगडफेक करणा-या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला, त्या अधिका-याने युवकाऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवे होते असे टि्वट परेश रावल यांनी केले होते.