शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेश, मायावती एकत्र आल्यास 2019ची लोकसभा जिंकू- लालूप्रसाद यादव

By admin | Updated: July 5, 2017 20:41 IST

राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश आणि मायावती यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश आणि मायावती यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. जर अखिलेश यादव आणि मायावती एकत्र आले, 2019ची लोकसभा निवडणूक नक्कीच जिंकू, असा विश्वास लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केला. अखिलेश यादव आणि मायावती हे 2019च्या निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता आहे. दोघेही एकत्र आल्यास 2019मध्ये भाजपचा खेळ समाप्त होईल, असंही लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या वर्धापनदिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी लालूप्रसाद यादव यांनी भाजपावरही टीका केली. प्रियंका गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि त्यांचे कुटुंबीयांना भाजपा सरकार विनाकारण टार्गेट करत आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाचे मायावती हे दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे. हे दोघे एकत्र आल्यास भाजप समाप्त होईल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने कालिया नागाने कलयुगात पुर्नजन्म घेतलाय. आम्ही कृष्णाप्रमाणेच या नागाला बिहारमधून पळवून लावले, अशा तिखट शब्दात लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनण्यासाठी पात्र नाहीत, असेही त्यांनी म्हटले होते. आणखी वाचा(नरेंद्र मोदी हे कलियुगातील कालिया नाग - लालूप्रसाद यादव)
(नरेंद्र मोदी बनलेत"NRI, त्यांना बनवा "जगाचे पंतप्रधान" - लालूप्रसाद यादव)
 
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदींची तुलना कालिया नागाशी केली होती. मोदींच्या रुपातील कालिया नाग आधी गुजरातला आणि आता संपूर्ण देशाला दंश करायला निघाला आहे, पण आम्ही कृष्णाप्रमाणेच या नागाला बिहारमधून पळवून लावले, असे त्यांनी म्हटले होते. आम्ही कोणत्याही जातीविरोधात लढा देत नसून आम्ही गरीबांसाठी ही लढाई करतोय असे त्यांनी नमूद केले होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी लालू यांनी पंतप्रधानांच्या विदेश दौ-यांच्या पार्श्वभूमीवर "मोदी हे NRI (अनिवासी भारतीय) बनले आहेत" अशी टीका केली होती. पंतप्रधान मोदींसाठी "जगाचे पंतप्रधान" असे पद तयार करावे असे अपीलही जगभरातील नेत्यांसमोर केले होते.  चारा घोटाळ्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयात आले असता त्यांनी पंतप्रधान मोदींवर आपल्या खास शैलीत टीका केली होती. " मोदी या देशाचे (भारत) पंतप्रधान आहेत, मात्र सर्वाधिक काळ ते देशाबाहेरच (विदेश दौ-यांमुळे) असतात. मोदींसाठी जगाचे पंतप्रधान असे पद तयार करावे, असे अपील मी जगभरातील नेत्यांना करू इच्छितो" असे ते म्हणाले होते.