शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जिओला टक्कर देण्यासाठी "डेटा जॅकपॉट"ची आयडिया

By admin | Updated: April 9, 2017 10:36 IST

डेटा जॅकपॉट प्लॅननुसार आयडियाच्या पोस्टपेड ग्राहकांना 100 रुपयांमध्ये 10 जीबी डेटा मिळणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - जिओच्या नवनव्या ऑफर्समुळे टेलिकॉम कंपन्यांमधील वॉर दिवसेंदिवस वाढत आहे. जिओला टक्कर देण्यासाठी आयडियानं नवा डेटा जॅकपॉट प्लॅन लाँच केला आहे. या डेटा जॅकपॉट प्लॅननुसार आयडियाच्या पोस्टपेड ग्राहकांना 100 रुपयांमध्ये 10 जीबी डेटा मिळणार आहे. आयडियानं "डेटा जॅकपॉट" प्लॅननुसार ग्राहकांना 100 रुपयांत प्रतिमहिना 10 जीबीच्या डेटाची ऑफर दिली आहे. या ऑफरनुसार तीन महिन्यांपर्यंत प्रतिमहिना 10 जीबी डेटा मिळवता येणार आहे. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये बदल होणार असून, आतापर्यंत 1 जीबीसाठी मोजावे लागणा-या पैशात तुम्हाला 10 जीबी डेटा मिळणार आहे. मात्र या ऑफरनुसार तीन महिन्यांनंतर तुम्हाला 100 रुपयांच्या रिचार्जवर प्रतिमहिना 1 जीबीच डेटा मिळणार आहे. मात्र कंपनीनं आम्ही वेळोवेळी आमच्या ऑफरमध्ये बदल करणार असल्याचं सांगितलं आहे.तत्पूर्वी रिलायन्स जिओनं प्राइम मेंबरशिप घेण्याची मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवून ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर दिली होती. तसेच जिओची प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायच्या आदेशानंतर जिओवर ही ऑफर मागे घेण्याची नामुष्की ओढावली होती. ज्या ग्राहकांनी जिओ समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याआधी प्राइम मेंबरशिप घेतली आहे, अशा ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे. जिओ धमाका! आता येणार Jio चा स्वस्त 4G लॅपटॉपसप्टेंबर 2016 मध्ये रिलायन्स जिओने मोफत 4जी अनलिमिटेड डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंगची सेवा लाँच केली होती. वेलकम ऑफर असं या सेवेचं नाव होतं. 31 डिसेंबर 2016 ला ही ऑफर संपण्यापूर्वीच कंपनीने ही ऑफर वाढवून पुन्हा हॅप्पी न्यू इयर ही ऑफर लाँच केली. तसेच एकाहून एक सरस ऑफर आणून धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करणार आहे. जिओ आता स्वस्त लॅपटॉप आणणार असल्याचं वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओ लवकरच 4जी सिम कार्ड स्लॉट असलेला लॅपटॉप लॉन्च करणार आहे.