शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम प्रशासनासाठी आता ‘आयडिया बॉक्स’!

By admin | Updated: August 28, 2014 02:40 IST

शासनसंबंधित बाबींवर तोडगा काढण्याकरिता काही अनोख्या सूचना मिळाव्यात या हेतूने सरकारने येथील नॉर्थ ब्लॉकच्या व्हरांड्यात एक आयडिया बॉक्स (सूचना पेटी) ठेवला

नवी दिल्ली : शासनसंबंधित बाबींवर तोडगा काढण्याकरिता काही अनोख्या सूचना मिळाव्यात या हेतूने सरकारने येथील नॉर्थ ब्लॉकच्या व्हरांड्यात एक आयडिया बॉक्स (सूचना पेटी) ठेवला असून त्यात ज्यांना कुणाला अशा ‘आऊट आॅफ बॉक्स’ सूचना करायच्या आहेत त्यांनी त्या लिहून त्यात टाकाव्यात अशी अपेक्षा आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये कर्मचारी व गृहमंत्रालयांसह अन्य मंत्रालयांची कार्यालये आहेत. कार्मिक व प्रशिक्षण विभागाने नॉर्थ ब्लॉकमध्ये अशा अनेक पेट्या विविध ठिकाणी लावल्या असून त्याच्या माध्यमातून कर्मचारी, अधिकारी व भेटीला येणाऱ्यांना आपल्या सूचना देता येणार आहेत.या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने, अनेक शासकीय कार्यालयांमध्ये अशा सूचना मंजूषा लावल्या आहेत; मात्र त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले. या नव्या सूचना पेट्यांमुळे नागरिकांना त्यांच्या सूचना देण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पेट्यांमध्ये टाकलेल्या सूचनांचा विचार गांभीर्याने केला जाईल, असेही ते म्हणाले. या पेट्या नॉर्थ ब्लॉकच्या तळमजला, पहिला व दुसऱ्या मजल्यावर लावण्यात आल्या आहेत. या पेट्या लावण्यामागे, कर्मचाऱ्यांमध्ये नवा जोश निर्माण होऊन त्यांच्याकडून सकारात्मक सूचना घेणे व कामकाजाला अधिक योग्य व दक्षतेने करण्याचे वातावरण निर्माण करणे हा असल्याचे ते म्हणाले. या उपक्रमासोबत विभागाने कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी गंभीर पावले उचलण्याचे ठरविले आहे. त्यात प्रत्येक महिन्यात एका कर्मचाऱ्याची निवड करून त्याला उत्तम कामगिरीकरिता प्रशस्तीपत्र देणे, त्यांना प्रशिक्षण देणे, वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांसोबत मुक्त चर्चा करण्याची संधी देणे यांचाही समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)