शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या ३० हजार कोटींच्या कर्जासाठी पर्यायांचा विचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:15 IST

एअर इंडियाचे ३० हजार कोटींचे कर्ज स्वत:च्या माथ्यावर घेण्यासाठी सरकार नीती आयोगाने सूचविलेल्या उपायाच्या पलिकडे जाऊन विविध पर्यायांवर विचार

नवी दिल्ली : एअर इंडियाचे ३० हजार कोटींचे कर्ज स्वत:च्या माथ्यावर घेण्यासाठी सरकार नीती आयोगाने सूचविलेल्या उपायाच्या पलिकडे जाऊन विविध पर्यायांवर विचार करीत आहे. एअर इंडियामधील काही हिस्सेदारी विकण्याचा पर्याय नीती आयोगाने सुचविलेला आहे.उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, विरोधी लिलावाच्या (रिव्हर्स बीड) माध्यमातून ३० हजार कोटी रुपये उभारण्याचा एक पर्याय सरकारकडून तपासून पाहिला जात आहे. एअर इंडियाच्या लँडिंग स्लॉट आणि अन्य आॅपरेटिंग मालमत्तांच्या अधिकारांची विक्री या माध्यमातून केली जाऊ शकते. या मालमत्तांमुळे एअर इंडियाला अन्य स्पर्धक खासगी विमान वाहतूक कंपन्यांच्या तुलनेत अनेक विशेषाधिकार मिळाले आहेत. विदेशात उड्डाण करताना त्यामुळे एअर इंडियाला कमी खर्च येतो. याशिवाय एअर इंडियाच्या मालकीच्या असंख्य पायाभूत सोयी भारतीय विमानतळांवर आहेत. त्यांच्या माध्यमातूनही निधी उभा केला जाऊ शकतो. एअर इंडियाकडून मिळणाऱ्या परताव्यात वाढ करण्याचे अनेक मार्ग सरकार समोर आहेत. अर्थात हे सर्व सध्या पर्यायांच्याच स्वरूपात आहेत. यापैकी नेमका कोणता पर्याय स्वीकारायचा याचा निर्णय मंत्री समूह घेईल.सरकारच्या वतीने एअर इंडियाला या कर्जाची माफी दिल्यास सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडणार आहे. कारण बँकांचे कर्ज सरकारला स्वीकारावे लागणार आहे. कर्ज देणाऱ्या बँकांनी या कर्जांची पुनर्रचना करण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही रिव्हर्स बीडच्या माध्यमातून समस्येवर मात करू शकतो.- एअर इंडियाच्या डोक्यावर सुमारे ६० हजार कोटींचे कर्ज आहे. त्यापैकी सुमारे २२ हजार कोटींचे कर्ज विमान खरेदी कार्यक्रमाशी संबंधित आहे. याशिवाय ६ हजार ते ७ हजार कोटी रुपयांचे कर्ज परिचालनाशी संबंधित आहे.यातील ३0 हजार कोटींचे कर्ज सरकारने स्वत:कडे घेऊन एअर इंडिया नव्या खरेदीदाराकडे सुपुर्द करावे, अशी शिफारस नीती आयोगाने केली आहे. कर्जाचा बोजा कमी झाल्यानंतर एअर इंडियाला चांगली किंमत मिळू शकते, असे आयोगाला वाटते.