शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ईडीने जप्त केली १२ हजार कोटींची संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:10 IST

सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गेल्या १५ महिन्यांत जवळपास १२ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. १0 वर्षात जितक्या रकमेची संपत्ती या विभागातर्फे जप्त केली गेली, त्यापेक्षाही हा आकडा मोठा आहे.

सुरेश भटेवरा ।नवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गेल्या १५ महिन्यांत जवळपास १२ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. १0 वर्षात जितक्या रकमेची संपत्ती या विभागातर्फे जप्त केली गेली, त्यापेक्षाही हा आकडा मोठा आहे.संसदेत शुक्रवारी एका प्रश्नाला उत्तर देतांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी नमूद केले की, गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या करदात्यांवर अस्थायी अथवा तात्पुरते जप्ती आदेश जारी केल्यानंतर ईडीने ११,0३२.२७ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, आर्थिक वर्ष २00५ ते २0१५ च्या दरम्यान जप्त केलेली संपत्ती जवळपास ९ हजार कोटींची आहे. ईडीने चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात ९६५.८४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, चुकीच्या मार्गाने पैसे कमवल्याची माहिती प्राप्त होताच धाडी घाला व आवश्यकता भासल्यास कठोर कारवाई करा, असे आदेश ईडीच्या उच्चपदस्थांनी आपल्या अधिकाºयांना दिले आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत आयकर विभाग, सीबीआय व सक्तवसुली संचलनालयात पुरेपूर समन्वय राहिल, याची काळजी सर्व विभागांनी घेतली आहे.केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयानेही बनावट कंपन्या शोधून काढण्यासाठी याच काळात एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली. ही समिती तीनही यंत्रणांच्या संपर्कात आहे. ज्या बनावट कंपन्यांनी विविध मार्गाने परदेशात परस्पर पैसे पाठवले, त्यांच्या विरोधातही ईडीने कारवाई चालवली आहे. एप्रिल २0१७ मधे चेन्नईच्या एका ३६ वर्षीय तरुणाला ईडीने अटक केली. या तरूणाने आपल्या ६ बोगस कंपन्यांव्दारे ७८ कोटींची रक्कम परदेशात पाठवली होती.