शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात बेडवर पाय ठेवून रुग्णाशी बोलणा-या आयएएस अधिका-याचा फोटो व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2016 11:13 IST

रुग्णालयात आजारी मुलाच्या आईशी बोलताना बेडवर पाय ठेवून उभ्या असलेल्या आयएएस अधिका-याचा फोटो सोशल मिडियावर सध्या व्हायरल होऊ लागला आहे

ऑनलाइन लोकमत - 
रायपूर, दि. 05 - रुग्णालयात आजारी मुलाच्या आईशी बोलताना बेडवर पाय ठेवून उभ्या असलेल्या आयएएस अधिका-याचा फोटो सोशल मिडियावर सध्या व्हायरल होऊ लागला आहे. छत्तीसगडमधील हा आयएएस अधिकारी या फोटोमध्ये महिलेशी बोलताना दिसत आहे. यावेळी ती महिला बेडवर बसली असताना हा अधिकारी मात्र त्याच बेडच्या लोखंडी दांड्याला पाय लावून उभा असल्याचं दिसल्याने फक्त नावासाठी ही चर्चा करत होते का ? असा सवाल सोशल मिडियामधून विचारला जात आहे.
 
या अधिका-याचं नाव जगदीश सोनकर आहे. 2013च्या बॅचमधील आयएएस अधिकारी असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे मेडिकल डिग्रीदेखील आहे. बलरामपूर जिल्ह्यातील रामानागुंजमध्ये उपविभागीय दंडाधिकारी पदावर ते कार्यरत आहेत. कुपोषणग्रस्त मुलांच्या आईंशी चर्चा करण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी जगदीश सोनकर सरकारी रुग्णालयात गेले होते. 
 
या रुग्णालयात कुपोषित मुलांवर उपचार करण्यात येत आहेत. यावेळी एका मुलाच्या आईशी बोलताना जगदीश सोनकर यांचा काढलेला हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या रुग्णालयात मुलांना व्यवस्थित उपचार मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र प्रशासनातील व्यक्तीच्या या अशा वागण्याने त्यांच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सोशल मिडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर जगदीश सोनकर यांनी माफी मागितली आहे.