शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महिला अधिकाऱ्याला वाचविताना IAS अधिकाऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: May 30, 2017 12:55 IST

दक्षिण दिल्लीच्या बेरसराय भागात सहकारी महिला अधिकाऱ्याला स्विमिंग पूलमध्ये बुडण्यापासून वाचवायला गेलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 30- दक्षिण दिल्लीच्या बेरसराय भागात सहकारी महिला अधिकाऱ्याला स्विमिंग पूलमध्ये बुडण्यापासून वाचवायला गेलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार सोनीपतमध्ये राहणारे 30 वर्षीय आशीष दहिया भारतीय प्रशासकीय सेवेत 2016मध्ये रूजू झाले होते. सोमवारी संध्याकाळी आपल्या काही मित्रांना भेटण्यासाठी ते सराय इथल्या फॉरेन सर्व्हिस इन्टिट्यूटमध्ये गेले होते. तेथील स्विमिंग पुलजवळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टी सुरू असताना सगळ्यांनी स्विमिंग पुलमध्ये पोहायला जाण्याचं ठरवलं  होतं. घटनास्थळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पार्टीमध्ये सगळे अधिकारी मद्यपान करत होते. 
स्विमिंग पुलजवळ पार्टी सुरू असताना एक महिला अधिकारी पाय घसरून पुलमध्ये पडली. तीला वाचविण्यासाठी आशिष दहिया यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी पुलमध्ये धाव घेतली. त्या महिला अधिकाऱ्याला पुलमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं पण तेव्हा आशिष बेपत्ता झाल्याचं त्याच्या मित्रांच्या लक्षात आलं होतं. पण तेव्हाच स्विमिंग पुलमध्ये तरंगताना आशिष त्यांच्या मित्रांना दिसला. आशिय दहिया यांना बाहेर काढून उपचार करण्यात आले होते. तेथिल स्टेशन मेडिकल ऑफिसर डॉ. प्रम्येश बसाल यांना बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आशिष दहिया यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे. 
दरम्यान या प्रकरणाची पुढची चौकशी आता पोलिसांकडून केली जाते आहे.