मैने घर अपने माँ के नाम कर दिया...
By admin | Updated: February 6, 2015 01:17 IST
रॅप-मध्ये-फोटो-ओळींसह-आहे.
मैने घर अपने माँ के नाम कर दिया...
रॅप-मध्ये-फोटो-ओळींसह-आहे. - इंडियन मेडिकल असोसिएशन : राष्ट्रीय हास्य कवी संमेलन नागपूर : विनोद हसता हसता एखाद्या घटनेवर, प्रसंगावर फार गंभीर भाष्य करतो. विनोद केवळ हसवीत नाही तर विचारप्रवृत्त करतो. हसता हसता डोळ्याच्या कडा अलगद ओलेत्या व्हाव्यात आणि आपल्याला माहीत असलेले जीवनाचे सत्य अचानक प्रगट व्हावे, असा काहीसा अनुभव हास्य कवी संमेलनात येतो. याचीच प्रचिती गुरुवारी आली. विनोदी रचना ऐकविताना त्यातील भाषिक सौंदर्य तर मनाला आनंद देणारे असतेच, पण त्यातला विचारही महत्त्वाचा असतो. व्यक्तिगत विनोद ते सामाजिक प्रश्नांना हात घालणाऱ्या कवींच्या रचनांनी हे कवी संमेलन रंगतदार ठरले. आयएमएच्यावतीने या राष्ट्रीय हास्य कवी संमेलनाचे आयोजन आयएमए सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग येथे करण्यात आले. याप्रसंगी अनेक सामाजिक गंभीर विषयांवर भाष्य करणाऱ्या कविता सादर करतानाच विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत हास्य कवींनी आज नागपूरकरांना आनंद दिला. शाब्दिक गुदगुल्या करीत...सातत्याने लोकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पेरत सर्वच कवींनी सामाजिक आणि राजकीय विषयांवर विनोदी भाष्य केले. सर्वच कवींचे सादरीकरण दाद द्यायला भाग पाडणारे होते. या संमेलनात देशातील सुप्रसिद्ध हास्य कवी राजेंद्र मालवीय, मुंबई, वाहेगुरू भाटिया, मुंबई, लोकेश जाडिया, धर, मनोज मद्रासी आणि विदिशाचे लक्ष्मण नेपाली सहभागी होऊन आपल्या हास्य कवितांनी रसिकांचे मनोरंजन केले. याप्रसंगी आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, सचिव डॉ. कु श झुनझुनवाला, डॉ. बी. के. शर्मा, डॉ. मुकुंद गणेरीवाल प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. संजय देशपांडे यांच्या हस्ते सर्व कवींचे स्वागत करण्यात आले. लक्ष्मण नेपाली म्हणाले, डॉक्टर आणि पत्नीजवळ जायची मला नेहमीच भीती वाटते, कारण दोघेही पैसे देत नाहीत, फक्त मागतात. असेच अनेक किस्से सांगून त्यांनी हसविले. यावेळी त्यांनी सादर केेल्या आईच्या कवितेने सर्वांनाच गंभीर केले. वाहेगुरूभाटिया यांनी स्वत: सरदार असूनही सरदारजींवर होणारे जोक्स ऐकविले. सरदार माणूस नसतो, कारण तो स्वत:वर विनोद करून इतरांना हसविणारा फरिश्ता असतो. मुंबईचे डॉक्टर फार खतरनाक असतात. ते स्मशानाजवळून जातात तेव्हा तेव्हा मुर्दे त्यांना विचारतात, आता तर सांगा नेमका रोग कोणता झाला होता. यावेळी वैद्यकीय क्षेत्रावरचेही काही चुटकुले सादर करून त्यांनी हसविले. मनोज मद्रासी यांनीही अनेक रचनांनी मजा आणली.