शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मी IIT इंजिनिअर, EVM मध्ये घोळ करायच्या 10 पद्धती सांगेल:केजरीवाल

By admin | Updated: April 14, 2017 22:05 IST

इव्हिएम मशिनबाबत गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा उघडणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा इव्हिएम मशिनसोबत छेडछाड करता येऊ शकते असं म्हटलं

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.14 - इव्हिएम मशिनबाबत गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा उघडणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा इव्हिएम मशिनमध्ये घोळ करता येऊ शकतो असं म्हटलं आहे.  मी IIT इंजिनिअर आहे आणि इव्हिएम मशिनमध्ये घोळ करण्याच्या 10 पद्धती सांगू शकतो असं केजरीवाल म्हणाले. याशिवाय दिल्लीची जनता दिल्ली सरकारच्या कामगिरीवर आनंदी असून राजौरी गार्डन येथे झालेल्या पोटनिवडणुकीला एमसीडी निवडणुकांचा ट्रेलर समजू नये असं म्हटलं आहे.  
 
 न्यूज चॅनल NDTV ला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल म्हणाले, दिल्लीमध्ये शिक्षण, आरोग्य, विज आणि पाण्यासंबंधी अनेक कामं करण्यात आली आहेत आणि सरकारने केलेल्या कामांबद्दल दिल्लीची जनता खूष आहे. राजौरी गार्डन पोटनिवडणुकीच्या पराभवाला त्यांनी,  जरनल सिंह यांनी पंजाब निवडणुकात घेतलेली उडी कारणीभूत ठरल्याचं सांगितलं. त्यांनी येथे खूप कामं केली पण पंजाबमध्ये जाण्याने जनता नाराज झाली होती आणि त्याचाच परिणाम निवडणुकांमध्ये दिसला, असं ते म्हणाले. 
 
 निवडणूक आयोग भाजपाला मदत करत असून आयोगावर विश्वास ठेवावा असं एकही पाऊल त्यांनी उचललेलं नाही असं केजरीवाल म्हणाले. इव्हिएम हॅक करण्याच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या आव्हानावर बोलताना ते म्हणाले, मी IIT इंजिनिअर आहे आणि इव्हिएम मशिनमध्ये घोळ करण्याच्या 10 पद्धती सांगू शकतो. 
 
 याशिवाय जाहिरातींवर केलेल्या खर्चाचा तपशील जर मला मागितला जात असेल तर सर्व मुख्यमंत्र्यांकडून हा तपशील मागवावा असं ते म्हणाले.