शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

असा गृहमंत्री यापूर्वी कधीच पाहिला नाही, ममतांचा अमित शाहंवर हल्लाबोल, म्हणाल्या...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 26, 2020 20:53 IST

ममतांनी सुभाष चंद्र बोसांचा जुना मुद्दा उचलला आणि कोरोना लशीवरूनही केंद्र सरकारला निशाण्यावर घेतले. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही, तर त्यानी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यावरही वैयक्तीक भाष्य केले. (mamta banerjee)

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका जस-जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तस-तसे तेथील राजकारण तापू लागले आहे. गुरुवारी ममता बॅनर्जी यांनी एका पत्रकार परिषदेत भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर थेट हल्ला चढवला. यावेळी त्यांनी सुभाष चंद्र बोसांचा जुना मुद्दा उचलला आणि कोरोना लशीवरूनही केंद्र सरकारला निशाण्यावर घेतले. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही, तर त्यानी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यावरही वैयक्तीक भाष्य केले.

अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडत ममता म्हणाल्या, मी असा गृहमंत्री यापूर्वी कधीच पाहिला नाही. एका गृहमंत्र्याने देश चालवायला हवा. मात्र, हे छोट्या-छोट्या निवडणुका मॅनेज करण्यात व्यस्थ आहेत. लोकांच्या घरी जेवन घ्यायला जातात आणि फोटो काढतात. आपला हल्ला कायम ठेवत ममता म्हणाल्या, देशाची परिस्थिती पहा आणि देशाच्या सीमा पाहा, अर्थव्यवस्था कुठे गेली आहे?

पंतप्रधान मोदींबरोबर झालेल्या बैठकीनंतर, आज कोरोना लशीवर बोलताना ममता म्हणाल्या "लशीच्या बाबतीत एवढ्या मोठ्या चर्चेत त्या सामील झाल्या, मात्र, लस कधी येणार, हे कुणालाही ठाऊक नाही. तरीही गेल्या सहा महिन्यांपासून ते "भाषाण" देण्यात व्यस्त आहेत." 

शेतकरी आंदोलनावरही केलं भाष्य -शेतकरी आंदोलनावर बोलताना ममता म्हणाल्या, केंद्र सरकारची सर्व लोकांच्या, सर्वप्रकारच्या मुलभूत अधिकारांवर ताबा मिळविण्याची इच्छा आहे. ते शेतकऱ्यांच्या लोकशाही अधिकारांवर अंकुश लाऊ शकत नाहीत. कृषी कायदा अवैध आहे. एखादा कायदा शेतकऱ्यांसाठी नाही, तर काळाबाजार करणाऱ्यांसाठी असेल, तर बे कायदेशी आहे. केंद्र सरकार शेतकऱ्याचे अधिकार का काढू इच्छिते? 

भाजपवर हल्ला चढवत ममता म्हणाल्या, "भाजपला केवळ एक व्यक्ती, एक राजकारण आणि एकच नेता असावा, असे वाटते, बाकी काही नाही. देश आपल्या सर्वांसाठी आहे. स्वातंत्र्य संग्रामात ते कुठे फिरत होते. त्यावेळी त्यांनी देशाबरोबर विश्वास घात केला. मी पूर्णपणे शेतकऱ्यांबरोबर आहे. जर त्यांनी मला बोलावले, तर मी त्यांच्या बाजूने मैदानात उतरायला तयार आहे," असेही ममता म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी