शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

विना शेती व मातीद्वारे चार्‍याची निर्मिती हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर : कुसुंबा गो-शाळेत ५०० गायींसाठी चार्‍याची व्यवस्था

By admin | Updated: March 21, 2016 00:21 IST

विलास बारी

विलास बारी
जळगाव - दुष्काळीस्थिती आणि अन्न धान्यांच्या उत्पादना दरम्यान चार्‍याच्या लागवडीसाठी न मिळणारे शेतीचे क्षेत्र यामुळे गुरांच्या चार्‍यांची टंचाई निर्माण होत आहे. त्यावर पर्याय शोधत कुसुंबा येथील अहिंसातिर्थ गो-शाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती व मातीचा वापर न करता मक्यापासून चार्‍याची निर्मिती केली जात आहे. प्रायोगिक तत्वावर १० गायींसाठी सध्या हा चारा तयार केला जात असून लवकरच ५०० गायींना पुरेल इतक्या चार्‍यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभा राहणार आहे.
दुष्काळीस्थितीमुळे चार्‍याची टंचाई
गेल्यावर्षी वार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पाऊस झाला. ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत जिल्हाभरात सरासरी ६६३.३ मि.मी.च्या तुलनेत केवळ ४२६.९४ मि.मी.पाऊस झाला. अवघा ६४ टक्के पाऊस झाल्यामुळे शेतीच्या उत्पादनासोबतच पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली. शेतातील उत्पादन कमी आले. त्यातच पुरेसा चारा नसल्याने गायी व म्हशींच्या संगोपनाची चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे.

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चार्‍याची उगवण
कुसुंबा येथील गो-शाळेत तीन हजारापेक्षा जास्त गायी, बैल, वासरे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशाचे संगोपन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चार्‍याची आवश्यकता भासत असल्याने गो-शाळेकडून जिल्हा व परजिल्ह्यातून ओला व सुका चारा मागवावा लागत आहे. त्यातच गो-शाळेचे व्यवस्थापक अभयसिंग व साहाय्यक व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने चार्‍याच्या निर्मितीवर भर दिला.
कशी आहे चारा निर्मितीची प्रक्रिया
सध्या या गो-शाळेत १० गायींसाठी चारा तयार होईल अशी व्यवस्था तयार केली आहे. सुरुवातीला जितका चारा तयार करायचा आहे, त्या प्रमाणानुसार मका काढून तो साफ केला जातो. त्यानंतर रात्रभर या मक्याला पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या ट्रेमध्ये साठवून ठेवण्यात येते. सकाळी पाणी काढून मका विशिष्ट पद्धतीच्या ट्रेमध्ये ठेवण्यात येतो. हे सर्व ट्रे एका रॅकमध्ये ठेवण्यात येतात. त्यानंतर या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्प्रिकलरच्या साहाय्याने एक तासाच्या अंतराने मका साठविलेल्या ट्रे वर फवारा मारण्यात येत असतो. या दरम्यान चारा तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते.