शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादेत बालविवाह रोखणार! तेलंगण प्रशासनाने उघडली मोहीम; काझींचे परवानेही केले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:56 IST

बालविवाह आणि अल्पवयीन मुलींचे वयस्क पुरुषांसोबत होणारे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज याविरुद्ध आता हैदराबाद जिल्हा प्रशासनाने मोहीम उघडली आहे. गरीब कुटुंबांतील मुलींवर जाळे टाकून आणि आर्थिक उलाढाल करून, असे विवाह ठरविले जातात.

हैदराबाद : बालविवाह आणि अल्पवयीन मुलींचे वयस्क पुरुषांसोबत होणारे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज याविरुद्ध आता हैदराबाद जिल्हा प्रशासनाने मोहीम उघडली आहे. गरीब कुटुंबांतील मुलींवर जाळे टाकून आणि आर्थिक उलाढाल करून, असे विवाह ठरविले जातात. यात मध्यस्थ आणि एजंट यांची महत्त्वाची भूमिका असते. विदेशातील लोकांकडून मोठी रक्कम घेऊन, असे प्रकार होत असल्याचेही उघड झाले आहे.गत आठवड्यात एका महिलेने अशी तक्रार केली होती की, आपली नणंद आणि तिचा नवरा यांनी तीन महिन्यांपूर्वी आपल्या १६ वर्षांच्या मुलीचा विवाह एका ओमान नागरिकाशी लावला आणि त्याबदल्यात पाच लाख रुपये घेतले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ओमानमधून या मुलीला परत आणण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.हैदराबादेतील बालसुरक्षा अधिकारी इम्तियाज रहिम यांनी सांगितले की, जुन्या शहरात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची संख्या गत काही वर्षांत कमी झाली आहे. एक बदल दिसून येत आहे, पण जुन्या शहरात अजूनही असे विवाह होताना दिसत आहेत. कारण मध्यस्थ आणि दलाल पैशांचे आमिष दाखवून असे विवाह ठरवितात. त्यामुळे विवाह निश्चित करण्यापूर्वी नवरदेवाच्या वयाची माहिती घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे विवाह करून देण्यात येत आहेत, हे दिसून आल्याने आम्ही काही काझींचे परवाने रद्दही केले आहेत. (वृत्तसंस्था)मशिदीच्या माध्यमातून समाजाची जागृती करणारआता आम्ही मशिदीच्या माध्यमातून समाजाची जागृती करणार आहोत. अशा प्रकारचे विवाह रोखण्यासाठी समाजात संदेश पोहोचविणार आहोत. मशिदीतूनही असे संदेश देण्यासाठी आम्ही वक्फ बोर्डाला विनंती करणार आहोत. अशा व्यवहारातून विवाह लावणाºया रॅकेटचा पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला आहे. विदेशी लोक शोषणासाठी मुलींची खरेदी करीत असल्याचेही दिसून आले आहे. विशेषत: गरीब कुटुंबांवर एजंटच्या माध्यमातून असे जाळे टाकले जाते.