शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद निवडणूक: ओवेसींनी तिकीट दिलेल्या 'त्या' ५ हिंदू उमेदवारांचं काय झालं?

By मोरेश्वर येरम | Updated: December 5, 2020 15:31 IST

हैदराबाद महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने एकूण ५१ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.

ठळक मुद्देहैदराबाद महापालिका निवडणुकीत ओवेसींचा पक्ष किंगमेकरच्या भूमिकेतओवेसींनी हिंदू उमेदवारांनाही दिलं होतं पक्षात स्थानटीआरएस ठरला सर्वात मोठा पक्ष, भाजपची दुसऱ्या स्थानावर मुसंडी

हैदराबादग्रेटर हैदराबादच्या महानगरपालिका निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून 'एमआयएम' पक्ष 'किंगमेकर'च्या भूमिकेत गेला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीला (टीआरएस) सर्वाधिक ५५ जागा मिळाल्या आहेत. तर एमआयएम पक्षाला ४४ जागांवर यश प्राप्त झालं आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी आपल्या पक्षातून ५ जागांवर हिंदू उमेदवार देखील उभे केले होते. 

हैदराबाद महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने एकूण ५१ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यात पक्षाकडून १० टक्के हिंदू उमेदवारांना आरक्षण देऊन ५ हिंदू उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या ५ उमेदवारांपैकी ३ उमेदवार विजयी झाले आहेत. तर दोन जागी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. विशेष म्हणजे, गेल्या निवडणुकीत केवळ ४ जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपने यावेळी जोरदार मुसंडी मारत ४८ जागांवर विजय प्राप्त केला आहे. 

ओवेसी यांच्या पक्षाकडून हिंदू उमेदवारांमध्ये पुरानापूल वॉर्डमधून सुन्नम राज मोहन, फलकनुमा वॉर्डातून के.थाराभाई आणि कारवान वॉर्डातून मांदागिरी स्वामी यादव यांनी विजय प्राप्त केला आहे. तर जामबाग वॉर्डात जदाला रविंद्र यांना भाजपच्या राकेश जयस्वाल यांच्याविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. कुतुबुल्लापूर वॉर्डातून एमआयएमचे ई.राजेश गौड यांना टीआरएस पक्षाच्या गौरिश पारिजाता यांनी मात दिली. 

कुणाला किती जागा?हैदराबाद महापालिका निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीला अर्थात टीआरएसला ५५ जागांवर यश मिळालं आहे. तर भाजपने ४८ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. एमआयएम पक्ष ४४ जागांसह तिसऱ्या स्थानी आहे. या सगळ्यात काँग्रेसला फक्त २ जागांवर समाधान मानवं लागलं आहे. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीHinduहिंदूAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन