शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या पतीस शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 22:26 IST

जळगाव : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी सुक्राम ओंकार कोळी (वय ५५, रा.कुसुंबा, ता.जळगाव) याला शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

जळगाव : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी सुक्राम ओंकार कोळी (वय ५५, रा.कुसुंबा, ता.जळगाव) याला शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
सुक्राम कोळी याने त्याची पत्नी सोनाबाई सुक्राम कोळी यांच्यावर १४ सप्टेंबर २०१३ रोजी सायंकाळी धारदार चाकूने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. हल्लात गंभीर जखमी झालेल्या सोनाबाई यांना ग्रामस्थांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबानुसार सुक्रामविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
नऊ साक्षीदार तपासले
हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एम. लव्हेकर यांच्या न्यायालयात चालला. त्यात सरकार पक्षातर्फे ॲड.अनुराधा वाणी यांनी नऊ साक्षीदार तपासले. सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तिवाद व परिस्थितीजन्य पुरावे ग्रा‘ धरत न्यायालयाने सुक्रामला भादंवि कलम ३०७ नुसार पाच वर्ष सक्तमजुरी व हजार रुपये दंड; दंड न भरल्यास ३ महिन्यांची शिक्षा तसेच भादंवि कलम ५०४ नुसार ३ वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. आरोपीतर्फे ॲड.शैलेश देसले यांनी काम पाहिले.