शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

वादळीवारा, गारांनी शहराला झोडपले

By admin | Updated: May 28, 2014 01:02 IST

रोहिणी बरसल्या : वृक्ष उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान; घरांचे पत्रे उडाले

रोहिणी बरसल्या : वृक्ष उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान; घरांचे पत्रे उडालेनाशिक : सोमवारी जिल्‘ात हजेरी लावलेल्या रोहिणीच्या पावसाने शहराला आज वादळीवार्‍यासह झोडपून काढले. सोसाट्याच्या वादळीवार्‍याने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले, तर अनेक घरांचे पत्रे उडून गेले, भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या. सकाळपासून शहरात उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यामुळे उकाड्यानेही नागरिक हैराण झालेले असताना, दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळीवारा वाहू लागला. काही मिनिटांच्या वादळीवार्‍यामुळे अवघे शहर धूलिकणांनी झाकोळून गेले होते. या वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या तारांवर पडल्याने अनेक भागातील वीजप्रवाह खंडित झाला होता. यानंतर काही वेळातच रोहिणीच्या जोरदार जलधारा बरसू लागल्या. त्यातच गारांचाही वर्षाव झाल्याने नाशिककरांची धांदल उडाली. जोरदार वादळीवार्‍यामुळे शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. या उन्मळून पडलेल्या वृक्षांखाली सापडून अनेक वाहनांचेही नुकसान झाले. उपनगरीय परिसरातील झोपडप˜्यांतील घरांचे पत्रे वादळीवार्‍याने उडून गेले, तर काही घरांच्या भिंतीही कोसळल्या. वृक्ष उन्मळून वाहनांचे नुकसानजिल्हाधिकारी कार्यालयातील वृक्ष उन्मळून पडल्याने चारचाकी वाहनांचे नुकसान झाले होते. जुना गंगापूर नाका येथेही वृक्ष उन्मळून पडल्याने एका रिक्षाचे नुकसान झाले. जेहान सर्कल परिसरातील वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली. पंचवटी कारंजा येथे २०० वर्षांचा पुरातन वृक्ष वादळीवार्‍यामुळे उन्मळून पडला. मखमलाबादकडून रामवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावरही वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. स्थानिक कार्यकर्त्यांनी सदरचा वृक्ष बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. घरांचे उडाले पत्रेवडाळागावातील राजवाडा परिसरातील अनेक घरांचे पत्रे वादळीवार्‍यामुळे उडून गेले, तर एका घरावर गुलमोहराचे झाड उन्मळून पडल्याने घराचे नुकसान झाले. तसेच केबीएच विद्यालयातही दोन निलगिरीचे वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली. त्याचप्रमाणे पंचवटीतील वाघाडी नाल्यालगतच्या वाल्मीकनगरमधील बुरुड डोह येथील अनेक घरांचे पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. सदरची वस्ती ही मोलमजुरी करणार्‍यांची असून, वादळीवारा अन् पावसामुळे त्यांच्या संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले.