शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांवर खर्च होतात हजारो कोटी, सेंटर फॉर मीडिया स्टडीजचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 02:00 IST

भारतातील राजकीय पक्ष निवडणुकांसाठी इतका पैसा कोठून आणतात, हा नेहमीच सामान्यांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. पण ती रक्कम किती असू शकेल? सेंटर फॉर मीडिया स्टडीज या संस्थेच्या अहवालानुसार देशात २0१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचारकार्यासाठी राजकीय पक्ष व उमेदवार यांनी मिळून तब्बल ३३ हजार कोटी रुपये खर्च केले होते.

नवी दिल्ली : भारतातील राजकीय पक्ष निवडणुकांसाठी इतका पैसा कोठून आणतात, हा नेहमीच सामान्यांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. पण ती रक्कम किती असू शकेल? सेंटर फॉर मीडिया स्टडीज या संस्थेच्या अहवालानुसार देशात २0१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचारकार्यासाठी राजकीय पक्ष व उमेदवार यांनी मिळून तब्बल ३३ हजार कोटी रुपये खर्च केले होते. जो अमेरिकेत २0१२ साली झालेल्या निवडणुकीपेक्षाही जास्त आहे.निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, २0१४ च्या लोकसभा निवडणुकांत प्रचारासाठी सर्वाधिक पैसा भाजपाने खर्च केला. ती रक्कम होती ७१४ कोटी. काँग्रेसने ५१६ कोटी रुपये खर्च केले. राष्ट्रवादीने खर्च केलेली रक्कम होती ५१ कोटी. बहुजन समाज पार्टीतर्फे ३0 कोटी रुपये निवडणुकीवर खर्च झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने खर्च केलेली रक्कम होती १९ कोटी रुपये. हा झाला राजकीय पक्षांचा खर्च त्यात त्या पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा समावेश नाही. तो सर्व एकत्र केल्यास रक्कम ३३ हजार कोटींवर जाते.अमेरिकेत २०१२ साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी ४ अब्ज डॉलर म्हणजेच २७ हजार कोटी रुपये खर्च झाले होते. म्हणजेच भारतातील राजकीय पक्षांनी २0१४ साली अमेरिकेपेक्षा जास्त खर्च केला.त्या वृत्तानुसार अमेरिकेत २0१६ साली डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध हिलरी क्लिंटन असा सामना जो झाला, त्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी मिळून आपल्या प्रचारावर ६.८ अब्ज डॉलर्स (४४ हजार कोटी रुपये) खर्च केले होते. भारतात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यावेळी अमेरिकेत २0१६ साली जो खर्च करण्यात आला, त्याहून अधिक रक्कम प्रचारावर खर्च होईल, असे सेंटर फॉर मीडिया स्टडीजने म्हटले आहे.२0 पक्षांनी दिला नाही खर्चाचा तपशीलसर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे. विधानसभा निवडणुकांचा खर्च ७५ दिवसांत व लोकसभा निवडणुकांचा खर्च ९0 दिवसांत देणे अपेक्षित असते. मात्र अद्याप २0 पक्षांनी खर्चाची माहिती आयोगाला दिलेली नाही. त्यामुळे आयोगाने त्या पक्षांना नोटिसा बजावल्या आहेत, असेही वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक