शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

इथे माणुसकी थिजली! वर्दळीच्या रस्त्यावर नराधम करत होता बलात्कार, लोक व्हिडीओ काढत होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 06:40 IST

Madhya Pradesh Crime News: येथे वर्दळीच्या रस्त्यावरील फूटपाथवर खुलेआम महिलेवर बलात्कार होत असताना, लोक मात्र याचा व्हिडीओ बनविण्यात व्यस्त असल्याचा धक्कादायक आणि मानवतेला कलंक लावणारा प्रकार समोर आला आहे.

उज्जैन - येथे वर्दळीच्या रस्त्यावरील फूटपाथवर खुलेआम महिलेवर बलात्कार होत असताना, लोक मात्र याचा व्हिडीओ बनविण्यात व्यस्त असल्याचा धक्कादायक आणि मानवतेला कलंक लावणारा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत आरोपीला अटक केली आहे.

पोलिस आता बलात्काराचा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. व्हिडीओ बनविणाऱ्या तरुणाने व्हिडीओ उज्जैनच्या काही सोशल मीडिया ग्रुपवर अपलोड केला होता. त्यानंतर तो व्हायरल झाला.

जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि लोकांची चौकशी करून पोलिस तरुणाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या तरुणाचा मोबाइल नंबर ट्रेस केला असून, त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधीक्षक प्रदीप शर्मा म्हणाले की, ज्याने व्हिडीओ बनवला त्याचा शोध सुरू आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान या प्रकरणी पोलिसांवर टीका होत आहे.

तिला दारू पाजली, नंतर बलात्कार केलापीडित महिला भीक मागून आपला उदरनिर्वाह करते. आरोपीचे नाव लोकेश असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. कोयला फाटकजवळ आरोपी तिला भेटला होता. लग्नाच्या बहाण्याने त्याने तिला आधी दारू पाजली आणि नंतर दारूच्या नशेत तिच्यासोबत गैरकृत्य केले. यानंतर तो धमकावून पळून गेला.

आरोपी बलात्कार करत राहिला, कोणीतरी व्हिडीओ बनवलाकोयला फाटक हा उज्जैनमधील सर्वात वर्दळीचा परिसर आहे. याच रस्त्यावर चरक हॉस्पिटल, पेट्रोल पंप आणि दारूचे दुकान आहे. घटनेदरम्यान कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवला. मात्र, आरोपीला रोखण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तो भाजी विकण्याचे काम करत होता.

काँग्रेसची टीका-या घटनेवरून काँग्रेसने पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.-प्रियांका गांधी यांनी म्हटले की, उज्जैनच्या पवित्र भूमीवर अशा घटनेमुळे मानवता कलंकित झाली आहे.-आज संपूर्ण देश सुन्न असून, आपला समाज कुठे चालला आहे? 

आजारी पतीला घेऊन जाताना रुग्णवाहिकेतच झाला बलात्काराचा प्रयत्न, पतीला खाली फेकलेउत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून आपल्या आजारी पतीसोबत सिद्धार्थनगरला जात असलेल्या महिलेचा रुग्णवाहिकेत रुग्णवाहिकेच्या चालकाच्या सहकाऱ्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.ही महिला लखनौला परतल्यानंतर तिने आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपी रुग्णवाहिका मदतनीसास अटक करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णवाहिकाही जप्त करण्यात आली आहे. रुग्णवाहिका चालक अद्याप फरार आहे.महिलेने रुग्णवाहिका चालकावर पतीचा ऑक्सिजन मास्क काढून त्याला रुग्णवाहिकेबाहेर फेकल्याचा आरोप केला आहे. या घटनेत महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश