शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कसा होईल व्हॅक्सिनचा पुरवठा

By admin | Updated: July 3, 2015 23:15 IST

जिल्हा परिषद : व्हॅक्सिन व्हॅनला परवाना नाहीनागपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून राष्ट्रीय ग्र्रामीण आरोग्य अभियानांतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जिल्हा आरोग्य विभागाला व्हॅक्सिन व्हॅन प्राप्त झाली आहे. परंतु परिवहन विभागाचा परवाना नसल्याने ही व्हॅन गेल्या दीड महिन्यापासून जिल्हा परिषद कार्यालयापुढे वापराविना उभी आहे. ...


जिल्हा परिषद : व्हॅक्सिन व्हॅनला परवाना नाही
नागपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून राष्ट्रीय ग्र्रामीण आरोग्य अभियानांतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जिल्हा आरोग्य विभागाला व्हॅक्सिन व्हॅन प्राप्त झाली आहे. परंतु परिवहन विभागाचा परवाना नसल्याने ही व्हॅन गेल्या दीड महिन्यापासून जिल्हा परिषद कार्यालयापुढे वापराविना उभी आहे. त्यामुळे जिल्ह्यात व्हॅक्सिनचा पुरवठा कसा होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जि.प.च्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३१६ उपकेंद्रांना शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या विविध प्रकारच्या व्हॅक्सिनचा पुरवठा केला जातो. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्या पुरविल्या जात होत्या. या कामासाठी रुणवाहिका वापरल्या जात नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याची ग्रामीण भगातील लोकांची ओरड होती. रुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध व्हावी या हेतूने सर्व जिल्ह्यांना व्हॅक्सिन व्हॅन उपलब्ध करण्यात आल्या आहे. परंतु दीड महिन्यापासून ही व्हॅन वापराविना उभी आहे. या संदर्भात आरोग्य विभागाकडे चौकशी केली असता परिवहन विभागाकडून अद्याप परवाना मिळाला नसल्याने व्हॅन उभी असल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)