शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मेहंदीबाग रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडी कशी सोडवाल

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

हायकोर्टाची विचारणा : प्रतिज्ञापत्र देण्याचे समितीला निर्देश

हायकोर्टाची विचारणा : प्रतिज्ञापत्र देण्याचे समितीला निर्देश

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी मेहंदीबाग रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडी कशी सोडवाल अशी विचारणा विशेष समितीला करून तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत.
२९ जानेवारी २०१४ रोजी न्यायालयाने मेहंदीबाग रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी विशेष समिती गठित केली होती. समितीत विभागीय आयुक्त, नासुप्रचे सभापती, महानगरपालिका आयुक्त, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे नागपूर येथील अधीक्षक अभियंता व वाहतूक विभागाचे उपायुक्त यांचा समावेश आहे. या समितीने व्हीएनआयटी (विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था) येथील तज्ज्ञांची उपसमिती स्थापन केली होती. तज्ज्ञ समितीने अहवाल देऊन वाहतूक सुरळीत होण्यासाठी मेहंदीबाग येथे सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे अंडरब्रिजला समांतर दुसरा रेल्वे अंडरब्रिज बांधण्याची सूचना केली आहे. याचिकाकर्त्यांचा याला विरोध आहे. सध्याच्या रेल्वे अंडरब्रिजमध्ये पाऊस आल्यानंतर पाणी साचते. यानंतर येथून तासन्तास अवागमन करता येत नाही. अशा परिस्थितीत दुसरा रेल्वे अंडरब्रिज किती उपयोगी ठरेल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने विशेष समितीला तज्ज्ञ समितीचा अहवाल लक्षात घेऊन प्रतिज्ञापत्र मागितले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड़ अनिल किलोर यांनी बाजू मांडली.