शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसाय संकटात तरी ‘ईज आॅफ डुर्इंग बिझनेस’ कसे? शरद यादव यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 03:09 IST

जनता दलाचे (यु) बंडखोर नेते शरद यादव यांनी देशात उद्योगव्यवसाय संकटात सापडला असताना देशात व्यवसाय करणे सहज (ईज आॅफ डुर्इंग बिझनेस) बनले असल्याच्या सरकारच्या भूमिकेवर बुधवारी टीका केली आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : जनता दलाचे (यु) बंडखोर नेते शरद यादव यांनी देशात उद्योगव्यवसाय संकटात सापडला असताना देशात व्यवसाय करणे सहज (ईज आॅफ डुर्इंग बिझनेस) बनले असल्याच्या सरकारच्या भूमिकेवर बुधवारी टीका केली आहे. जागतिक बँकेने भारताला नुकतेच ‘ईज आॅफ डुर्इंग बिझनेस’चे रँकिंग दिले आहे.शरद यादव यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मोदी सरकार म्हणते की देशात व्यवसाय, व्यापार करणे सोपे झाले आहे परंतु वस्तुस्थिती ही आहे की सगळीकडे व्यापार, व्यवसाय विस्कळीत झाला आहे. सकल देशी उत्पादन (जीडीपी) दोन टक्के कमी झाले असतानाही सरकार जागतिक बँकेची रेटिंग दाखवून आपलीच पाठ थोपटून घेत आहे. नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक ठरले आहेत व त्यातून बाहेर पडण्यासाठी किमान दहा वर्षे लागतील, असे यादव म्हणाले.यादव यांनी सांगितले की, सरकार डिजिटल इंडियाबद्दल बोलते परंतु त्याचवेळी लोक अन्नावाचून मरत आहेत. अन्नधान्याने गोदामे भरलेली आहेत परंतु सरकारच्या धोरणांमुळे लोकांना अन्न मिळत नाही. जनतेला आश्वासने देऊन ती न पाळल्याचा आरोप यादव यांनी केला. आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी धर्माच्या आधारावर फूट पाडली जात आहे व त्यासाठी ताजमहल व टिपू सुलतानसारखे मुद्दे शोधले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला हवे..गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्याविरोधात आम्ही आमचे उमेदवार देणार आहोत, असे यादव म्हणाले. निवडणूक चिन्हाबद्दल बोलताना यादव यांनी निवडणूक आयोगाकडे त्यासाठी अपील केल्याचे सांगितले. त्यावर सहा नोव्हेंबर रोजी निर्णय होईल. त्यानंतरच राजकीय धोरण ठरवले जाईल. गुजरातेत भाजपच्याविरोधात सगळ््यांना एकत्र येऊन लढायला पाहिजे.

टॅग्स :GSTजीएसटी