शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मिशा नसताना मी भ्रष्टाचार कसा केला? तेजस्वी यादवांचा मोदी सरकारला प्रश्न

By admin | Updated: July 12, 2017 14:18 IST

बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयू यांचे गठबंधन अतूट असल्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.

ऑनलाइन लोकमतपटना, दि. 12 - बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयू यांचे गठबंधन अतूट असल्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या परिवाराविरोधात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून सीबीआयने कारवाई केल्यापासून बिहार राजकरणाला नवे वळण मिळाले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तेजस्वी यादव यांनी आज नितिश कुमार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत आपल्यावरील आरोपाचं खंडण करत केंद्र सरकरवर निशाना साधला आहे. ते म्हणाले, माझ्यावर झालेले स्रव आरोप 2004 मधील आहेत. त्यावेली 12-13 वर्षांचा असेल. त्यावेळी मला मिशा देखील आल्या नव्हत्या. ज्या मुलाला मिशा फुटल्या नाहीत तो  भ्रष्टाचार कसा करेल. यावेळी त्यांनी केंद्र सरकर आपल्याला घाबरल्याचा दावाही केला. भाजपाने लालू प्रसाद यादव परिवाराला नाही तर संपूर्ण बिहारला बदनाम करण्याचा कट केला आहे. आम्ही गरिबाविषयी प्रश्न उपस्थित केले, शेतकऱ्यांविषयी बोललो. पंतप्रधानांनी केलेल्या आश्वासनावर आम्ही बोललो. आम्ही मागासवर्गीय कुटुंबतील असल्यामुळे आमच्यावर कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे.

आणखी वाचा 
 
 
 (लालू प्रसाद यादव गोत्यात! सीबीआयने दाखल केला गुन्हा)
(लालू प्रसाद यादव कंसाचे वंशज - बाबा रामदेव)
(अर्णब गोस्वामींचा धमाकेदार कमबॅक, पहिल्याच शोमध्ये लालू प्रसाद यादव टार्गेट)

लालूप्रसाद यांच्यासह त्यांच्या सर्व कुटुंबीयांवर सीबीआयने छापे घेतल्यापासून तेजस्वीप्रसाद यांना मंत्रिमंडळातून काढावे, यासाठी नितीशकुमार यांच्यावर स्वपक्षीयांकडून दबाव वाढत आहे. दुसरीकडे तेजस्वीप्रसाद राजीनामा देणार नाहीत, असा निर्णय राजदच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेजस्वीप्रसाद यांना मंत्रिमंडळात ठेवणे, याचा अर्थ भ्रष्टाचारास पाठिंबा देणे होईल, असे जनता दल (युनायटेड) च्या मंत्री व आमदारांचे म्हणणे आहे.सीबीआयने मागच्याच आठवडयात हॉटेलच्या गैरव्यवहार प्रकरणात तेजस्वी, लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेच्या दोन हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात पाटणा येथील मोक्याचा भूखंड पदरात पाडून घेतल्याचा या तिघांवर आरोप आहे. 2006 मध्ये लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना हा व्यवहार झाला होता.