शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कसे हटवणार अतिक्रमण?...जोड आहे..

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

कारवाई ठप्प: नासुप्रचे अतिक्रमण विरोधी पथक दहशतीत!नागपूर : नासुप्रच्या अनेक खुल्या भूखंडावर असामाजिक तत्त्वांनी कब्जा केलेला आहे. असे अतिक्रमण हटविताना पथकावर हल्ले करण्याच्या घटना वाढल्याने नासुप्रचे अतिक्रमण विरोधी पथकच दहशतीत आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून पथकाची कारवाई ठप्प आहे. अशा परिस्थितीत अतिक्र्रमण कसे हटविणार, असा गंभीर ...


कारवाई ठप्प: नासुप्रचे अतिक्रमण विरोधी पथक दहशतीत!
नागपूर : नासुप्रच्या अनेक खुल्या भूखंडावर असामाजिक तत्त्वांनी कब्जा केलेला आहे. असे अतिक्रमण हटविताना पथकावर हल्ले करण्याच्या घटना वाढल्याने नासुप्रचे अतिक्रमण विरोधी पथकच दहशतीत आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून पथकाची कारवाई ठप्प आहे. अशा परिस्थितीत अतिक्र्रमण कसे हटविणार, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
शहरात मोक्याच्या ठिकाणी नासुप्रच्या जागा आहेत. यावर गुंड प्रवृत्तीच्या काही टोळ्यांनी संगनमताने कब्जा केलेला आहे. दुसरीकडे अतिक्रमण कारवाई करताना पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने पथकावर हल्ले होतात. त्यामुळे शहरातील नासुप्रच्या चार विभागांनी अतिक्रमण कारवाई करण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळावा. अशी शिफारस मुख्यालयाकडे केली आहे. परंतु मागणीनुसार पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने चित्र आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी बैठका सुरू आहेत. परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही. अतिक्रमण करणाऱ्यांचे समर्थक पथकावर हल्ले करतात. याला आळा घालण्यासाठी विभागीय कार्यालयांनी मुख्यालयाकडे पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्याचा प्र्रस्ताव पाठविला आहे. दुसरीकडे गरज भासल्यास पुरेसा पोलीस बंदोबस्त दिला जातो. असा दावा प्रशासनाने केला आहे. नासुप्र पथकाला कारवाई करण्यासाठी गृहमंत्रालयाने १२ पोलीस कर्मचारी उपलब्ध केले आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन नासुप्रकडून दिले जाते. परंतु काही दिवसापूर्वी सहा पोलिसांना मुख्यालयात तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे सहा पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटविणे शक्य होत नाही. पोलिसांची संख्या कमी असल्याने पथकावर हल्ले करण्याच्या घटना मागील काही दिवसात वाढल्या आहेत. त्यामुळे पथकातील अधिकारी व कर्मचारी दहशतीत आहेत.
चौकट..
मागील काही दिवसातील हल्ल्याच्या घटना
१ : मार्च महिन्यात पाटणकर चौकात अतिक्रमण काढताना अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न.
२ : जून महिन्यात शांतिनगर भागात दुकानाचे अतिक्रमण काढताना पथकाला घेराव.
३ : जून महिन्यात अवस्थीनगर भागातील जाफरनगर येथे पथकावर दगडफेक
४ : मानकापूर भागातील झिंगाबाई टाकळी येथील प्रवेशव्दाराजवळ जीम संचालकाच्या समर्थकांसोबत झडप
५ : जरीपटका भागातील नारा घाट येथील जमिनीवरील अतिक्रमण कारवाई पोलीस संरक्षण नसल्याने स्थगित