शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

...कशी होती मंत्री झालेल्या त्या 4 निवृत्त अधिका-यांची कारकीर्द. 

By सुमेध उघडे | Updated: September 4, 2017 20:02 IST

खूप दिवसांपासून उत्सुकता असलेला केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार काल पार पडला. या विस्तारावर ही नेहमी प्रमाणे मोदी-शहा यांच्या धक्का तंत्राचा प्रभाव जाणवला. सर्वात मोठा धक्का होता तो  शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांमध्ये 4 माजी अधिका-यांच्या समावेशाचा. यातील दोन जण खासदार आहेत तर दोन जणांना सहा महिन्यात लोकसभा किंवा राज्यसभेवर निवडून यावे लागेल. जाणून घेऊ या ४ अधिका-यांच्या बाबतच्या खास गोष्टी. 

खूप दिवसांपासून उत्सुकता असलेला केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार काल पार पडला. या विस्तारावर ही नेहमी प्रमाणे मोदी-शहा यांच्या धक्का तंत्राचा प्रभाव जाणवला. सर्वात मोठा धक्का होता तो  शपथ घेतलेल्या 9 राज्यमंत्र्यांमध्ये 4 माजी अधिका-यांच्या समावेशाचा. यातील दोन जण खासदार आहेत तर दोन जणांना सहा महिन्यात लोकसभा किंवा राज्यसभेवर निवडून यावे लागेल. जाणून घेऊ या ४ अधिका-यांच्या बाबतच्या खास गोष्टी. 

1. सत्यपाल सिंह ( निवृत्त आयपीएस )सत्यपाल सिंह यांना मानव संसाधन मंत्रालयाचे राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. लहानपणी  शास्त्रज्ञ बनण्याची इच्छा असणारे सत्यपाल 1980 मध्ये महाराष्ट्र केडर मधून आयपीएस बनले. त्यांनी  दिल्ली विद्यापीठातून रसायनशास्त्रात एमफिल केले असून ऑस्ट्रेलियामधून एमबीए  चे सुद्धा शिक्षण घेतले आहे. 

मुंबईमध्ये 90 च्या दशकात छोटा राजन, छोटा शकील व अरुण गवळी यांच्या गैंगची दहशत असताना सिंह क्राइम ब्रांचचे ज्वॉइंट कमिशनर होते.  याच काळात त्यांनी अंडरवर्ल्ड च्या विरोधात स्पेशल टास्क फोर्स बनवली.  दया नायक, प्रदीप शर्मा, विजय साळसकर सारखे एनकाउंटर स्पेशलिस्ट याच दरम्यान मुंबई पोलिसमध्ये निर्माण झाले. सिंह यांनी नक्षली भागात सुद्धा काम केले आहे. नक्षलवाद या विषयात त्यांचा हातखंडा असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून यावर शोधनिबंध सुद्धा सादर केला आहे.  ते इशरत जहां केसवरील एसआईटीच्या तीन सदस्यातील एक होते.  

31 जानेवारी 2014 ला त्यांनी मुंबई पोलीस कमिशनर असताना पदाचा राजीनामा दिला. लागलीच 2 फेब्रुवारीस त्यांनी मेरठ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला. बागपत मधून लोकसभा निवडणूक लढवत त्यांनी राष्ट्रीय लोकदल चे अध्यक्ष अजीत सिंह यांना 2 लाख पेक्षा जास्त मतांनी हरवले. या विस्तारात त्यांना मंत्री बनवण्यामागे उत्तर प्रदेश मधील पश्चिम भागातील जातीय समीकरण कारणीभूत असू शकतात. या भागात जाट अधिक असून सत्यपाल सुद्धा याच समुदायातून येतात. 

2. राजकुमार सिंह ( निवृत्त आयएएस ) स्वतंत्र प्रभार असलेल्या ऊर्जा खात्याचे मंत्री म्हणून राजकुमार सिंह या विस्तारात मंत्रिमंडळाचा भाग झाले आहेत. ते बिहार मधून 1975 च्या केडरचे आईएएस अधिकारी होते. यूपीएच्या सत्ताकाळात त्यांनी होम सेक्रेट्री पदी काम केले. यांच्या बाबत विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, 30 ऑक्टोंबर 1990 ला लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या रथयात्रेच्या दरम्यान त्यांनी समस्तीपुर येथे अटक केली होती. यासोबतच नितीशकुमार यांचे तत्कालीन सरकार सत्तेत असताना त्यांनी समस्तीपुर, चंपारण व पटना येथे केलेल्या कामाने सरकारची प्रतिमा चांगलीच उंचावली होती. 

आडवाणी गृहमंत्री असताना 1999 ते 2004 पर्यंत ते गृहमंत्रालयात ज्वॉइंट सेक्रेट्री होते.  यानंतर 30 जून 2011 ते 30 जून 2013 पर्यंत गृह सचिव राहिले. 13 डिसेंबर 2013 मध्ये त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. या प्रवेशासोबतच त्यांनी नितीश सरकारच्या विरोधात आघाडी उघडली व त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आरा येथून जनता दलाच्या मीना सिंह यांचा पराभव केला. नितीशकुमार यांच्या एनए ... प्रवेशानंतर राजकुमार यांच्या मंत्रिमंडळातील समावेश  अनेक  प्रश्नांना जन्म देणारा ठरत आहे. 

3. हरदीप सिंह पुरी (  निवृत्त आयएफएस ) शहर विकास मंत्रालय चे राज्यमंत्री बनलेले हरदीप सिंह यांचे शिक्षण दिल्ली विद्यापीठातून झाले आहे .यासोबतच स्टीफेंस कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापनाचे काम सुद्धा केले आहे. परंतु, काही दिवसातच त्यांनी परराष्ट्र खात्यात प्रवेश केला. 28 फेब्रुवारी 2013 ला ते निवृत्त झाले. 

परराष्ट्र खात्यात काम अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी ब्राझील, जापान, श्रीलंका व ब्रिटेन सारख्या देशात सेवा प्रदान केली होती. यामुळेच त्यांना विदेश नीति व राष्ट्रीय सुरक्षा या विषयातील जाणकार म्हणून मान्यता आहे.  विशेष बाब म्हणजे शिक्षण घेत असताना ते जेपी यांच्या आंदोलनात सहभागी होते. यासोबतच अरुण जेटली यांच्यासोबत त्यांची खास मैत्री आहे. 2 जानेवारी 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  4. अल्फ़ोंस कन्ननथनम ( निवृत्त आयएएस )अल्फ़ोंस यांना पर्यटन मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे.  ते 1979 च्या केरल केडरचे आईएस अधिकारी होते.  1989 मध्ये केरल मधील ट्टयम जिल्ह्यास 100 टक्के साक्षर करण्याची कामगिरी केल्याने सर्वात प्रथम ते उजेडात आले. टाइम मासिकाने 5 डिसेंबर 1994 च्या त्यांच्या कव्हर स्टोरीमध्ये जागतिक स्तरावरील 100 तरुण नेतृत्वात त्यांचा समावेश केला होता. 

दिल्ली येथे डीडीए चे कमिशनर म्हणून काम करत असताना त्यांनी 14,310 अवैध इमारती तोडल्या होत्या. यामुळे साकारला जवळपास 10,000 करोड़चा फायदा झाला. 2006 मध्ये ते निवृत्त झाले व लागलीच केरळ मधून कंजिरापल्ली येथून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. अपक्ष असताना  मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ने त्यांना पाठिंबा दिला व ते त्यावेळी निवडून आले.  2011मध्ये लोकसभा कार्यकाळ पूर्ण होताच त्यांनी तत्कालीन भाजप अध्यक्ष नितिन गडकरी यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला.