नवी दिल्ली : मुंबई विमानतळाजवळील झोपडपट्टीवासीयांना पर्यायी घरे मिळावीत, अशी मागणी करणारे पत्र उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून, सोमवारी त्यांनी लोकसभेत शून्य प्रहरातही हीच मागणी केली.
त्या म्हणाल्या, की एचडीआयएल कंपनीच्या अनास्थेमुळे मुंबई विमानतळाजवळील 9क् हजार झोपडीधारकांना त्यांच्या हक्काची घरे मिळत नाहीत. दीड लाख घरे तयार असूनही त्यांचा ताबा दिला जात नाही. एसआरएअंतर्गत झोपडपट्टी सुधारणोचे कंत्रट एचडीआयएलला मिळूनही या धोरणांतर्गत मिळालेले सर्व लाभ मिळवून तसेच मिळालेला अधिक एफएसआय इतरत्र वापरून ही कंपनी झोपडीवासीयांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा
आरोप त्यांनी केला.
भारतातील दुस:या क्रमांकाचे विमानतळ म्हणून ओळखल्या जाणा:या सध्याच्या मुंबई विमानतळाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. केवळ एकाच धावपट्टीमुळे विमाने उडण्यास व उतरविण्यास प्रचंड विलंब होतो व प्रवाशांचे हाल होतात. विमानतळाचा विकास, विस्तार व सुरक्षा महत्त्वाचे आहे असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या, की नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यास 2क्18 उजाडेल, तोर्पयत या शहराची वाहतूक आणखी विस्तारेल़ विमानांच्या उड्डाणांचे प्रश्न कठीण होतील, सुरक्षेचा प्रश्न भेडसावेल, हा विचार करून झोपडीवासीयांचा प्रश्न त्वरित सोडवावा. (विशेष प्रतिनिधी)