शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांचे घर आहे की शीतगृह?

By admin | Updated: July 4, 2015 02:27 IST

एकेकाळी सरकारी निवासस्थान नाकारत वेगळेपण सिद्ध करू पाहणारे आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी

नवी दिल्ली : एकेकाळी सरकारी निवासस्थान नाकारत वेगळेपण सिद्ध करू पाहणारे आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी ३० एसी आणि असंख्य कूलर्स लावत आपली बात ‘आम’ राहिली नसल्याचे दाखवून दिले आहे. जून महिन्यातील त्यांच्याकडील विजेचे बिल १.३५ लाख रुपये आले असून काँग्रेस आणि भाजपने हा मुद्दा बनवीत जोरदार हल्लाबोल चालविला आहे.सिव्हिल लाईन्स येथील केजरीवालांच्या ६ फ्लॅग स्टाफ रोड निवासस्थानी विजेचे दोन मीटर असून त्यापैकी एका मीटरचे बिल २२,६८९ रुपये, तर दुसऱ्याचे १,१३,५९८ रुपये एवढे आले आहे. गेल्या महिन्यात आरटीआय अर्जावर माहिती देताना दिल्ली सरकारने एप्रिल आणि मे महिन्याचे बिल ९१ हजार रुपये असल्याचे नमूद केले होते. केजरीवालांच्या निवासस्थानी खूप कमी वीज वापरली जात असून या दोन महिन्यांच्या बिलाला आॅफिसमधील विजेचे शुल्क जोडण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले. केजरीवालांच्या घरी ३० पेक्षा जास्त एसी असून असंख्य कूलर लावले आहेत. कार्यालयीन कामासाठी घरगुती कनेक्शन वापरल्याबद्दल वीज वितरण कंपनी त्यांना नोटीस पाठवू शकते, असे सूत्रांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)काँग्रेस, भाजपचा हल्लाबोलकेजरीवाल वैयक्तिक वापरासाठी सरकारी निधी वाया घालवत आहेत. सत्तेवर आल्यानंतर आपच्या नेत्यांनी आलिशान राहणीत न अडकता ‘आम’ लोकांप्रमाणे राहावे, असा सल्ला दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी दिला आहे. केजरीवाल वैयक्तिक सुविधेसाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर करीत असल्याचा आरोप भाजपचे विजेंदर गुप्ता यांनी केला आहे. दिल्लीतील जनतेला ‘आप’चा खरा चेहरा कळून चुकला आहे, असेही ते म्हणाले.