दिल्लीतील हॉटेल्सचे दर २०० टक्क्यांनी वाढले हाऊसफुल्ल गर्दी : आपचे देशभरातील कार्यकर्ते राजधानीत
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीसाठी आम आदमी पार्टीचे देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत गोळा होत असल्याने हॉटेल्स हाऊसफुल्ल झाले असून खोल्यांच्या दरात भरमसाठ म्हणजे किमान २०० टक्के वाढ झाली आहे.
दिल्लीतील हॉटेल्सचे दर २०० टक्क्यांनी वाढले हाऊसफुल्ल गर्दी : आपचे देशभरातील कार्यकर्ते राजधानीत
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीसाठी आम आदमी पार्टीचे देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत गोळा होत असल्याने हॉटेल्स हाऊसफुल्ल झाले असून खोल्यांच्या दरात भरमसाठ म्हणजे किमान २०० टक्के वाढ झाली आहे.पहाडगंज, करोलबागमधील हॉटेल्सचे सर्वसाधारण दर ५०० ते १२०० रुपये असून दिल्लीला भेटी देणारे पर्यटक स्वस्त दरांमुळे या भागातील हॉटेल्सला पसंती देत असतात, पण गेल्या दोन दिवसांत दर २५०० वर गेले आहेत. सध्या मुलांच्या परीक्षेचे दिवस असल्यामुळे हॉटेल्सचे दर ५०० ते ७०० रुपयांच्या घरात होते, मात्र अचानक गेल्या दोन दिवसांत भाव घसघशीत वाढले आहेत. बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवासाची पक्षाने व्यवस्था केलेली नसून ती त्यांनी स्वत:च करावी असे सांगण्यात आले आहे. नेमके किती कार्यकर्ते येतील याचा अंदाज लावता येणे अशक्य आहे. देशभरातून किमान २० हजारांवर कार्यकर्ते येतील अशी अपेक्षा असल्याचे आपच्या एका नेत्याने सांगितले.---------------------दलालांची चांदी.... दिल्ली रेल्वेस्थानकावर ग्राहकांना हेरून हॉटेलमध्ये खोल्यांची व्यवस्था करणाऱ्या एजंट लोकांचीही कमाई अचानक वाढली आहे. काहींनी तर महिनाभर काम नाही मिळाले तरी चालेल एवढी कमाई दोनच दिवसांत झाल्याची कबुली दिली आहे.------------------कोटमाझ्या हॉटेलमध्ये बारा खोल्या असून त्यातील एकही रिकामी नाही. याआधी दर ७०० रुपये होता. आता १५०० रुपये दर आकारला आहे.- पहाडगंजमधील एक हॉटेलमालक.