नवर्याच्या अंगावर टाकले गरम पाणी
By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST
जळगाव: पती नांदायला येत नसल्याने तिला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या पती कैलास राजू चौधरी (रा.चौघुले प्लॉट) यांच्या अंगावर पत्नी, सासू व मेव्हणी यांनी अंगावर गरम पाणी टाकले. यात चौधरी भाजले गेल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी दुपारी चार वाजता चौघुले प्लॉटमधील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली.
नवर्याच्या अंगावर टाकले गरम पाणी
जळगाव: पती नांदायला येत नसल्याने तिला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या पती कैलास राजू चौधरी (रा.चौघुले प्लॉट) यांच्या अंगावर पत्नी, सासू व मेव्हणी यांनी अंगावर गरम पाणी टाकले. यात चौधरी भाजले गेल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी दुपारी चार वाजता चौघुले प्लॉटमधील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली.पती-पत्नीत वाद असल्याने कैलास यांची पत्नी कविता हि माहेरी चौघुले प्लॉट भागात निघून गेली होती. पती शुक्रवारी दुपारी चार वाजता तिला नांदण्यासाठी घ्यायला गेला असता कविताने येण्यास नकार दिला.त्यामुळे दोघांमध्ये किरकोळ वाद झाले. त्यातच सासू कल्पना रमेश पाटील, पत्नी कविता व मेहुणी कोमल या तिघांनी कैलास यांच्या तोंडावर गरम पाणी टाकले. यात किरकोळ भाजल्याने ते जखमी झाले. याप्रकरणी शनिवारी शनी पेठ पोलीस स्टेशनला तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.