शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

पुन्हा वृक्षावर कुर्‍हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2016 00:03 IST

जळगाव : शहरात वृक्षांची कत्तल थांबत नसून ती वाढतच असल्याचे चित्र आहे. रविवारी नवीपेठेतील एका वृक्षावर पुन्हा कुर्‍हाड चालली. मात्र वन्य जीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी वेळीच धाव घेऊन ती रोखली. यामध्ये परवानगी ज्या झाडाची आहे त्या जातीचे झाड न तोडता दुसर्‍याच जातीचे झाड तोडले जात असल्याचे संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

जळगाव : शहरात वृक्षांची कत्तल थांबत नसून ती वाढतच असल्याचे चित्र आहे. रविवारी नवीपेठेतील एका वृक्षावर पुन्हा कुर्‍हाड चालली. मात्र वन्य जीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी वेळीच धाव घेऊन ती रोखली. यामध्ये परवानगी ज्या झाडाची आहे त्या जातीचे झाड न तोडता दुसर्‍याच जातीचे झाड तोडले जात असल्याचे संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.
शहरात सध्या वृक्ष तोडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. अशाच प्रकार रविवारी नवीपेठेत घडला. येथे एका दुचाकीच्या शोरुम समोर असणार्‍या झाडाच्या फांद्या तोडण्याची परवानगी मनपाने दिली आहे. येथे या फांद्यासह वरील भागही तोडला जात असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष वासुदेव वाढे यांना मिळाली. त्यावेळी त्यांनी तेथे धाव घेऊन ही तोड रोखली. त्यावेळी मिळालेली परवानगी पाहिली असता गुलमोहोरच्या झाडाच्या फांद्या तोडण्याची परवानगी आहे, मात्र प्रत्यक्षात येथे सोनमोहेरचे झाड तोडले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी हा प्रकार रोखला. रविवार असल्याने संबंधित शोरुम मालक तेथे नसल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

मनपाचेही दुर्लक्ष ..
ज्या झाडाच्या फांद्या तोडण्याची परवानगी दिली आहे, त्याच झाडाच्या फांद्या तोडल्या जात आहे की, दुसर्‍या झाडाच्या, याकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. १५ ते २० वर्षाचे व साधारण ५० फूट उंच असलेल्या या झाडाच्या फांद्या तोडताना तेथे मनपाचे अधिकारी अथवा कर्मचारी कोणीच नव्हते.

पक्षांचा अधिवास नष्ट...
ज्या फांद्या तोडल्या त्यावर बुलबुल या पक्षाचे घरटे होते. तेही काढण्यात आल्याने पक्षांचाही अधिवास नष्ट करण्यात आला.