शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चाँद तारों को छूने की आशा, आसमानों मे उडने की आशा

By admin | Updated: October 18, 2016 04:41 IST

‘चाँद तारों को छूने की आशा, आसमानों मे उडने की आशा...’ पण, काश्मीरातील परिस्थितीमुळे हे स्वप्न सत्यात उतरणार की नाही?

जम्मू : ‘चाँद तारों को छूने की आशा, आसमानों मे उडने की आशा...’ पण, काश्मीरातील परिस्थितीमुळे हे स्वप्न सत्यात उतरणार की नाही? असा प्रश्न मनात असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यावर उत्तरही एव्हाना शोधले आहे. आपल्या स्वप्नांना आकार देण्यासाठी हे विद्यार्थी आता जम्मूकडे शिक्षणासाठी धाव घेऊ लागले आहेत. काश्मीर खोऱ्यात १०० दिवसांपासून जनजीवन विस्कळीत आहे. त्यामुळे शिक्षणासाठी जम्मूत जाण्याशिवाय अनेक विद्यार्थ्यांसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील १७ वर्षीय सुरैय्या गुलजार नागरी सेवेत जाऊ इच्छिते. तर, पुलवामाच्या खुर्शीदला ह्दयरोग तज्ज्ञ व्हायचे आहे. १२ वीतील खुर्शीद म्हणतो की, आम्ही जर शिकलो नाही तर जगाच्या स्पर्धेत कसे उभे राहू शकणार? येथे शंभर दिवसांपासून शैक्षणिक संस्था बंद असल्याने जम्मूच्या एखाद्या शाळेत जाण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही. गुलजार म्हणते की, शाळा जर बंद केल्या जात असतील तर तुम्ही आयएएस, डॉक्टर, इंजिनियर कसे होणार? आम्ही काही दिवस शाळा सुरू होण्याची वाट पाहिली. अखेर जम्मू येथे शाळेत प्रवेश घेतला. खुर्शीद म्हणतो की, त्याचे अनेक मित्र शिक्षण पुढे सुरू ठेवू इच्छितात. पण, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने बाहेरगावी प्रवेश घेऊ शकत नाहीत. गुलजारसह तीन विद्यार्थ्यांनी जम्मूच्या सुनजवान भागात सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला आहे. प्राचार्य पे्रम सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत काश्मीरच्या ३० विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांनी सांगितले की, आमच्याकडे दररोज काश्मीर खोऱ्यातून अनेक फोन येतात. प्रवेशासाठी ते विचारणा करतात. परीक्षा वेळेवरच व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारनेही वेळेवर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मूच्या खासगी शाळातही गेल्या तीन महिन्यांपासून काश्मीरमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेत आहेत. (वृत्तसंस्था)>परीक्षा वेळेवरच व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारनेही वेळेवर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मूच्या खासगी शाळातही गेल्या तीन महिन्यांपासून काश्मीरमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेत आहेत.