शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ, कंगना यांचा सन्मान

By admin | Updated: May 4, 2016 03:18 IST

अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेतार व कंगना रानावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने येथे

नवी दिल्ली : अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेतार व कंगना रानावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने येथे दिमाखदार सोहळ््यात गौरविण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हे ६३ व्या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण मंगळवारी झाले.मनोज कुमार यांना सुवर्ण कमळ व रोख दहा लाख रुपये असा चित्रपटसृष्टीतील हा सर्वोच्च व मानाचा असा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमिताभ बच्चन यांना ‘पिकू’ चित्रपटातील भूमिकेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रजत कमळ व ५० हजार रुपये रोख असा हा पुरस्कार आहे. यापूर्वी बच्चन यांनी १९९० (अग्निपथ), २००५ (ब्लॅक) आणि २००९ मध्ये (पा) हा पुरस्कार मिळविला होता. ‘तनु वेड्स मनु रिटर्न’ चित्रपटातील भूमिकेसाठी कंगना रानावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. रजत कमळ व ५० हजार रुपये रोख असे त्याचे स्वरुप आहे. यापूर्वी कंगनाने ‘फॅशन’ आणि ‘क्वीन’ चित्रपटातील भूमिकांसाठी हा पुरस्कार मिळविला होता.‘बाहुबली’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कार मिळविला. दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि निर्माते शोभू यारलागद्दा आणि प्रसाद देवीनेनी यांनी सुवर्ण कमळ, प्रमाणपत्र आणि रोख असा हा पुरस्कार स्विकारला. संजय लीला भन्साळी यांनी ‘बाजीराव मस्तानी’ या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवरील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. सुवर्ण कमळ, प्रमाणपत्र आणि रोख अडीच लाख रुपये असा हा पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट मनोरंजन वर्गात ‘बजरंगी भाईजान’ ने पुरस्कार मिळविला.६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त कलाकृती व कलाकारसर्वोत्कृष्ट चित्रपट : बाहुबलीसर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स : बाहुबली सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी (बाजीराव मस्तानी)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत (तनु वेड्स मनु रिटर्नस्)सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमिताभ बच्चन (पिकू)सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : तन्वी आझमी (बाजीराव मस्तानी)सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : समुथीराकणी (विसरनाई)सर्वोत्कृष्ट बाल कलाकार : गौरव मेनन (बेन)सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : दुरांतो मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट :बजरंगी भाईजानसामाजिक विषयावरील सर्र्वोत्कृष्ट चित्रपट : निर्णायकमपर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : वलिया चिराकुल्लू पक्षीकालसर्वोत्कृष्ट संपादन : लेफ्ट. टी. ई. किशोर (विसरनाई)पदार्पणातील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा इंदिरा गांधी पुरस्कार : नीरज घायवान (मसान)राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा नर्गिस दत्त पुरस्कार : नानकशाह फकीरसर्वोत्कृष्ट रंगभूषा : नानकशाह फकीरसर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन : एम. जयचंद्रन (कथिरुन्नू कथिरुन्नू ईन्नू निंते मोईदीन)सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : इलिया राजा (थराई थप्पट्टाई)सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक : मोनाली ठाकूर (मोह मोह के धागे- दम लगा के हय्या)सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : महेश काळे (कट्यार काळजात घुसली)बेस्ट ज्युरी अवॉर्ड : कल्की कोचलीन(मार्गारिटा विद ए स्ट्रॉ)सर्वोत्कृष्ट गीतकार : वरुण ग्रोव्हर(मोह मोह के धागे- दम लगा के हय्या)सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी : रेमो डिसोझा (दिवानी मस्तानी-बाजीराव मस्तानी)सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफी : सुदीप चॅटर्जी (बाजीराव मस्तानी)सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) : जुही चतुर्वेदी (पिकू), हिमांशू शर्मा (तनु वेड्स मनु रिटर्नस्)सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद (जुही चतुर्वेदी (पिकू), हिमांशू शर्मा (तनु वेड्स मनु रिटर्नस्)स्पेशल मेन्शन : रितिका सिंह (इरुधी सुत्रू (साला खडूस)स्पेशल मेन्शन : जयसूर्या(सू सू सुधी वथमीकम आणि लुका छुपी) स्पेशल मेन्शन : रिंकू राजगुरू (सैराट)बेस्ट फिल्म फ्रेंडली अवॉर्ड : गुजरातबेस्ट फिल्म फे्रंडली अवॉर्ड : स्पेशल मेन्शन टू उत्तर प्रदेश आणि केरळच्सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट : कोथनोदीच्सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट : शंखचीलसर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : दम लगा के हय्यासर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट : तिथीसर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपट : एनिमीसर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट : पथेमारीसर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : रिंगणसर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट : पहादा ला लुहासर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट : विसरनाईसर्वोत्कृष्ट संस्कृत चित्रपट : प्रियमानसमसर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट : मिथिला मखानसर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपट : कांचीसर्वोत्कृष्ट मणिपुरी चित्रपट : इबुसु याओहानबियुसर्वोत्कृष्ट वांछू चित्रपट : द हेड हंटरसर्वोत्कृष्ट बोडो चित्रपट : दाऊ हुदुनी मेथाईसर्र्वोत्कृष्ट हरयाणवी चित्रपट : सतरंगीसर्वोत्कृष्ट खासी चित्रपट : ओनाताहसर्वोत्कृष्ट नॉन फिचर फिल्म :अमदावद मा फेमससर्वोत्कृष्ट आर्ट कल्चर फिल्म : ए फार आफ्टरनून -ए पेंटेड सागाबेस्ट बायोग्राफिकल : लाईफ इन मिठापूरसर्वोत्कृष्ट शॉर्ट फिक्शन फिल्म : अवसादबेस्ट अ‍ॅनिमेशन अवॉर्ड : फिशरवुमन अँड टुकटुकसर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट पुरस्कार :आॅटो ड्रायव्हर