शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

गृहमंत्र्यांचा पाकवर ठपका

By admin | Updated: June 27, 2016 04:09 IST

पाम्पोरमधील हल्ला हा त्याचेच निदर्शक आहे, असा स्पष्ट आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी पाकिस्तानचे नाव न घेता केला.

फतेहगड साहिब (पंजाब) : आपला शेजारी देश भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. पाम्पोरमधील हल्ला हा त्याचेच निदर्शक आहे, असा स्पष्ट आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी पाकिस्तानचे नाव न घेता केला. सीआरपीएफच्या आठ जवानांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना काही चुका झाल्या किंवा काय, याचा तपास करण्यासाठी एक समिती पाम्पोर येथे पाठविण्यात येईल, असेही राजनाथ सिंह यांनी जाहीर केले.शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पाम्पोर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याबद्दल राजनाथसिंग यांनी सुरक्षा दलांवर स्तुती सुमने उधळली. ते म्हणाले, काही चुका झाल्या काय याचा तपास करण्यासाठी दोन सदस्यांचे पथक पाम्पोर येथे पाठविण्यात यावे, असे निर्देश गृह सचिवांना दिले आहेत. भविष्यात अशा चुका होऊ नयेत आणि अशाप्रकारच्या हल्ल्यांमध्ये आमच्या जवानांवर शहीद होण्याची पाळी येऊ नये यासाठी हे पथक जाणार आहे. ‘आमच्या शूर जवानांचे मी कौतुक करतो. त्यांच्या शौर्याला माझा सलाम. दहशतवाद्यांनी धूर्तपणे जवानांवर हल्ला केला. परंतु आमच्या जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांना यशस्वीपणे टिपले,’ असे राजनाथसिंग म्हणाले. पंजाबच्या फतेहगड साहिब येथे रविवारी शीख योद्धा बाबा बंदासिंग बहादूर यांच्या ३०० व्या हुतात्मा दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (वृत्तसंस्था)>पाम्पोर हल्ला हा काश्मीरला बदनाम करण्यासाठीचपाम्पोरसारखे दहशतवादी हल्ले काश्मीरला बदनाम करण्यासाठीच घडविण्यात येतात. संभाव्य गुंतवणूकदार आणि पर्यटकांना येथे येण्यापासून रोखणे हा अशा हल्ल्यांमागचा हेतू आहे, असा आरोप जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. मुफ्ती यांनी पाम्पोर हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या आठ जवानांना श्रद्धांजली वाहिली.आपले कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य बनविणे निषेधार्ह आहे. हा रमजानचा पवित्र महिना आहे. या महिन्यात लोक क्षमाशील असतात आणि घडलेल्या पापाची क्षमा मागतात. आपल्याकडून कुणी दुखावला जाणार नाही, याची काळजी घेण्याचा हा महिना आहे. अशा हल्ल्यांमधून काहीही साध्य होणार नाही. केवळ काश्मीरची बदनामी होईल, असे त्या म्हणाल्या.