शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

यापुढे ६० पेक्षा जास्त व्हीआयपी सुरक्षेविना गृहमंत्रालयाचा निर्णय : महाराष्ट्रातील तीन माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश

By admin | Updated: September 3, 2015 23:52 IST

सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण,

सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण,
पृथ्वीराज चव्हाण यांची सुरक्षा काढली
......................
संपुआच्या काळातील ६० पेक्षा जास्त व्हीव्हीआयपींची सुरक्षा हटविली
...........

नबीन सिन्हा/ नवी दिल्ली : संपुआच्या काळातील ६० पेक्षा जास्त व्हीव्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. देशभरातील व्हीआयपींना पुरविलेल्या सुरक्षेचा आढावा घेताना केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठ्या प्रमाणात फेरबदलाची प्रक्रिया अवलंबली आहे. महाराष्ट्रातील तीन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना केंद्रीय सुरक्षा कवच असलेल्या यादीतून वगळण्यात आले आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे नातेवाईक, लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) दिल्या जाणार्‍या सुरक्षेचा दर्जा कमी करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती आणि स्मृती तसेच जावई आणि अन्य कुटुंबियांना यापुढे कोणतीही सुरक्षा असणार नाही. गृहमंत्रालयाने २१ ऑगस्ट रोजी व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेचा बारकाईने आढावा घेतला.
------------------------------
अनेक माजी केंद्रीय मंत्र्यांना फटका
संपुआ सरकारमधील अनेक माजी केंद्रीय मंत्री आणि घटनात्मक पदे भूषविणार्‍या अधिकार्‍यांची सुरक्षा पूर्वीपेक्षा निम्नस्तराची असेल. त्यांना दिल्लीत स्वीय सुरक्षा अधिकारी मिळेल. तसेच मतदारसंघांमध्ये त्यांच्या सोबत तीनपेक्षा जास्त सुरक्षारक्षक असणार नाहीत. सुबोधकांत सहाय, श्रीप्रकाश जयस्वाल, कमलनाथ, जितीन प्रसाद, व्ही. नारायणस्वामी, अंबिका सोनी, मनीष तिवारी, आर.के. धवन, माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम आदींचा त्यात समावेश आहे. माजी संरक्षणमंत्री ए.के. ॲन्टनी, आरपीएन सिंग, जितेंद्रसिंग यांच्यासारख्या काही मंत्र्यांनी अशा प्रकारची सुरक्षा नाकारली आहे. माजी मंत्रिमंडळ सचिव अजित सेठ, माजी गृहसचिव अनिल गोस्वामी, मणिपूरचे माजी राज्यपाल व्ही.के. दुग्गल आणि त्यांचे कुटुंबीय, मनमोहनसिंग यांचे माजी सल्लागार टीकेए नायर, नवीन जिंदल, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल तेजिंदर खन्ना आदींची सुरक्षा काढून घेण्यात आली किंवा कमी केली आहे.
-------------------------------
वड्रांची विशेष सुरक्षा काढणार
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांची एनएसजी सुरक्षाही कमी करण्याचा विचार केला जात आहे. वड्रा यांना यापूर्वी कोणत्याही विमानतळावर अंगझडती किंवा सुरक्षा तपासणीतून जावे लागत नव्हते. त्यांचा हा विशेष दर्जा अलीकडेच काढून घेण्यात आला. त्यांना सीआयएसएफची सुरक्षा दिली जाईल. मात्र, त्यात चारपेक्षा जास्त जवान असणार नाहीत. या जवानांचे वेतनही त्यांच्याकडून वसूल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
............