शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

एचएमटी घड्याळाचे ‘टिकटिक’ थांबणार

By admin | Updated: September 12, 2014 02:52 IST

कोट्यवधी भारतीयांच्या गेल्या दोन पिढ्यांनी देशी स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून अभिमानाने मनगटावर बांधलेली एचएमटी घड्याळे आता इतिहासजमा होणार

नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांच्या गेल्या दोन पिढ्यांनी देशी स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून अभिमानाने मनगटावर बांधलेली एचएमटी घड्याळे आता इतिहासजमा होणार आहेत. या घड्याळांचे उत्पादन करणाऱ्या ‘एचएमटी वॉचेस’ या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे वृत्त आहे.हिंदुस्थान मशिन टूल्स (एचएमटी) या सार्वजनिक क्षेत्रातील मुख्य कंपनीची एचएमटी वॉचेस ही एक उपकंपनी असून १९६१ मध्ये जपानच्या सिटिझन वॉच कंपनीच्या सहकार्याने तिची स्थापना केली गेली होती. त्या काळात लोकांना तस्करीच्या मार्गाने देशात येणाऱ्या विदेशी मनगटी घड्याळांची ‘क्रेझ’ होती. ‘एचएमटी’ने वाजवी किमतीच्या दर्जेदार घड्याळांची निर्मिती करून घड्याळांची तस्करी जवळजवळ बंद पाडली. परंतु इतर खासगी देशी कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून राहणे एचएमटीला जनेमासे झाले व गेली सलग १४ वर्षे ही कंपनी सतत तोट्यात चालत होती. कंपनीला २०१२-१३ मध्ये २४२ तर २०११-१२ मध्ये २२४ कोटी रुपये तोटा झाला होता. २००० मध्ये एचएमटी वॉच बिझनेस ग्रुपची एचएमटी वॉचेस लिमिटेड अशी फेरबांधणी करण्यात आली होती. तथापि, या फेररचनेनंतरही तोटा काही कमी झाला नाही.