शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता गाईंसाठीही हायटेक मसाज पार्लर

By admin | Updated: May 1, 2017 16:05 IST

लाला लजपतराय पशू चिकित्सा व पशू विज्ञान विश्वविद्यालयाने देशी गायींच्या प्रजातींमध्ये सुधारणा आणण्यासाठी व दुधाचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून संशोधन सुरू केले आहे.

ऑनलाइन लोकमत

हिसार(हरियाणा), दि. 1 - लाला लजपतराय पशू चिकित्सा व पशू विज्ञान विश्वविद्यालयाने देशी गायींच्या प्रजातींमध्ये सुधारणा आणण्यासाठी व दुधाचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून संशोधन सुरू केले आहे. 
 
एवढंच नाही तर हरियाणातील पहिले हायटेक गाय फार्म प्रकल्पावरही काम सुरू करण्यात आले आहे.  येथे गाईंना आंघोळ घालण्यापासून ते त्यांना मसाज करण्यापर्यंत व स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने यंत्रांच्या सहाय्याने सर्व देखभाल करण्यात येणार आहे. एकप्रकारे गाईंसाठी हे हायटेक मसाज पार्लर असल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण प्रणालीला "ऑटोमॅटिक पार्लर" असे नाव देण्यात येणार आहे. 
 
यंत्रांद्वारेच येथे पशूंचे दुध काढण्यात येणारे व गरजेनुसार त्यांना चाराही घालण्यात येईल. हे सर्व कार्य कम्प्युटरच्या सहाय्याने करण्यात येणार आहेत. 
 
लाला लजपतराय पशू चिकित्सा व पशू विज्ञान विश्वविद्यालयचे एनिमल जेनेटिक्स अँड ब्रीडिंग डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. ए.एस यादव यांनी सांगितले की, या हायटेक गाय फार्मसाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत 3 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. 
हे फार्म दोन एकर क्षेत्रावर साकारण्यात येणार आहे.  यासाठी टेंडरही जारी करण्यात आले आहे आणि आतापर्यंत तीन परदेशी कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी पसंतीही दर्शवली आहे. हे फार्म सध्या युनिर्व्हसिटीतील जुन्या कॅम्पसमध्ये उभारण्यात येईल.
 
नवीन कॅम्पस बनवल्यानंतर हे फार्म दुसरीकडे हलवण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे केवळ एक कर्मचारी कम्प्युटरच्या सहाय्याने संपूर्ण फार्मची जबाबदारी सांभाळू शकतो. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. यादव यांनी सांगितले की, दुध काढणारे यंत्र गाईचे वजन, दुधाचे प्रमाण यानुसार स्वतःहून गाईंना चरण्यासाठी चारा देणार. या प्रकल्पामुळे कृषि क्षेत्रात नक्कीच क्रांती घडण्याची शक्यता आहे.