शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अण्णाद्रमुकमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती, दुस-यांदा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: February 15, 2017 11:55 IST

तामिळनाडू सिनेजगतात सुपरस्टार राहिलेल्या एम. जी. रामचंद्रन यांनी स्थापन केलेला अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे.

ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. 15- तामिळनाडूच्या राजकारणाकडे सध्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. तामिळनाडू सिनेजगतात सुपरस्टार राहिलेल्या एम. जी. रामचंद्रन यांनी स्थापन केलेला अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अडीच दशके जयललितांच्या नेतृत्वात यशस्वी वाटचाल केल्यानंतर अण्णा द्रमुकमध्ये ही अभूतपूर्व स्थिती उद्भवली आहे. जयललिता यांच्या निधनानंतर हा पक्ष व्ही. के. शशिकला आणि ओ. पनीरसेल्वम यांच्यामध्ये विभागला गेला आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्यामुळे शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवास आणि दहा कोटी रुपये दंडाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने सुनावली आहे. मात्र त्यानंतर समर्थक आमदारांची बैठक घेऊन त्यांनी ओ. पनीरसेल्वम यांना तडकाफडकी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आणि ई. के. पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात त्या यशस्वी ठरल्या. मात्र अजूनही अण्णाद्रमुक पक्षावर विभाजनाचं संकट घोंघावत आहे. पलानीस्वामी यांच्यासोबत ओ. पनीरसेल्वमही विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची शक्यता आहे.(शशिकलांना तुरुंगवास)(गुंतागुंत आणखी वाढली)जयललितांनंतर शशिकला पक्षाच्या सर्वोच्च नेत्या समजल्या जात होत्या. त्यामुळे त्यांनी पनीरसेल्वम यांच्या जागी स्वतः मुख्यमंत्री बनण्याच्या प्रयत्न केल्यानं पक्षावर विभाजनाची स्थिती ओढावली आहे. पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपद भूषवताना पक्षात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शशिकला यांच्या तुरुंगवारीमुळे पनीरसेल्वम गटात आनंदाचे वातावरण असून, आता आणखी काही आमदार आपल्याकडे येतील, असे मुख्यमंत्र्यांचे समर्थक सांगत आहेत. या आमदारांचे मन वळवण्यासाठी पनीरसेल्वम गटाचे काही नेते प्रयत्नशील आहेत. याच वेळी ब-याच काळ सत्तेपासून दूर असलेल्या डीएमकेच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. पनीरसेल्वम की पलानीसामी?, या वादाचा थेट फायदा डीएमकेला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.