हिंगणा...
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
हिंगणा...
सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचारहिंगणा : घरी एकटीच असल्याचे पाहून एका सात वर्षीय चिमुकलीवर विधिसंघर्षग्रस्त बालकाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उखळी येथे घडली. हिंगणा पोलिसांनी विधिसंघर्ष बालकास बुधवारी ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. २७ जानेवारीला पीडित बालिका घरी एकटीच होती. दरम्यान दुपारी २ वाजताच्या सुमारास विधिसंघर्षग्रस्त बालक तिथे गेला. सदर चिमुकलीला त्याने घराशेजारच्या एका झोपडीत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. याबाबत कुणाजवळ वाच्यता न करण्याची तंबीही त्याने पीडित बालिकेला दिली.या घटनेच्या दोन-तीन दिवसानंतर पीडित मुलीच्या पोटात दुखायला लागल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला हिंगणा येथील दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांच्या तपासणीनंतर सदर प्रकार तिच्या आई- वडिलांच्या लक्षात आला. त्यानुसार पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी सदर विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. पुढील तपास ठाणेदार दीपक वानखेडे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)