शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंनो बंगालमध्ये गुजरात दंग्यांप्रमाणे प्रत्युत्तर द्या; भाजपा आमदार बरळला

By admin | Updated: July 9, 2017 11:43 IST

पश्चिम बंगालमध्ये उफाळलेला हिंसाचार आणि दंगली यांना हिंदूंनी 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलींप्रमाणे प्रत्युत्तर द्यावे, असे आक्षेपार्ह

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 -  पश्चिम बंगालमध्ये उफाळलेला हिंसाचार आणि दंगली यांना हिंदूंनी 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलींप्रमाणे प्रत्युत्तर द्यावे, असे आक्षेपार्ह वक्तव्य तेलंगणामधील भाजपा आमदार राजा सिंह यांनी केले आहे. आधीच बंगालमधील वातावरण बिघडलेले असताना राजा सिंह यांनी फेसबूकवरील आपल्या व्हीडिओमधून थेट चिथावणीच दिल्याने या वक्तव्यावरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे. 
बंगालमधील पेटलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राजा सिंह यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  या व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये राजा सिंह म्हणाले, "बंगालमधील हिंदूंकडे सध्या दोनच रस्ते आहेत. एक म्हणजे काश्मीरप्रमाणे नपुंसक बनून तेथून पळ काढायचा किंवा संघटित होऊन 2002च्या गुजरात दंगलीची बंगालमध्ये पुनरावृत्ती करावी." 
 सध्याच्या परिस्थितीत बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नसल्याचा दावा राजा सिंह यांनी आपल्या व्हिडिओत केला आहे.  तसेच पश्चिम बंगालमधील सरकार दंगेखोरांना सूट देत आहे असा आरोपही त्याने केला आहे. बंगालमधील हिंदू जागरुक झाले नाहीत तर काश्मीरमधील हिंदूंप्रमाणेच त्यांना पळवून लावले जाईल, असेही तो या व्हिडिओत म्हणतो.