शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘हिंदूंना अल्पसंख्य दर्जाची मागणी आयोगाकडे करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:39 IST

आठ राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्य दर्जा देण्याचा केंद्र सरकारला आदेश द्यावा, या याचिकेवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

ठळक मुद्देमुस्लिम लक्षद्वीपमध्ये ९६.२०, जम्मू आणि काश्मीरमध्ये ६८.३०, आसाम ३४.२०, पश्चिम बंगाल २७.५, केरळ २६.६०, उत्तर प्रदेश १९.३० आणि बिहार १८ टक्के आहेत.

नवी दिल्ली : आठ राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्य दर्जा देण्याचा केंद्र सरकारला आदेश द्यावा, या याचिकेवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने निर्णय घ्यावा, असा हा विषय असून, याचिकाकर्त्याने त्याच्याकडे हा विषय उपस्थित करावा. सार्वजनिक हिताच्या याचिकेमध्ये जम्मू आणि काश्मीर, पंजाब, लक्षद्वीप, मिझोराम, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये हिंदूंना अल्पसंख्याकांचा दर्जा दिला जावा, असे म्हटले. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या या याचिकेत वरील राज्यांत हिंदू हे अल्पसंख्य आहेत व त्यांना मिळणारे नैसर्गिक लाभ अल्पसंख्याकांबद्दल राज्य पातळीवर अधिसूचना जारी न झाल्यामुळे व ओळख निर्माण न केल्यामुळे बहुसंख्यांकाकडे वळवले जात आहेत, असे म्हटले.केंद्र सरकारने अल्पसंख्य विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासाठी २० हजार शिष्यवृत्ती उपलब्ध केल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये मुस्लिम ६८.३० टक्के असून, सरकारने ७५३ शिष्यवृत्यांपैकी ७१७ मुस्लिम विद्यार्थ्याना दिल्या आहेत; परंतु एकाही हिंदू विद्यार्थ्याला दिलेली नाही, असे याचिकेत म्हटले आहे. केंद्र सरकारने १९९३ मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार मुस्लिम, ख्रिश्चन्स, शीख, बौद्ध आणि पारसी यांना भारतात अल्पसंख्याकाचा दर्जा दिला गेला आहे व २०१४ मध्ये या यादीत जैनांचाही समावेश केला गेला. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेचा हवाला देऊन याचिकेत म्हटले आहे की, आठ राज्यांत हिंदू अल्पसंख्य आहेत. लक्षद्वीप २.५ टक्के, मिझोराम २.७५, नागालँड ८.७५, मेघालय ११.५३, जम्मू आणि काश्मीर २८.४४, अरुणाचल प्रदेश २९, मणिपूर ३१.९० आणि पंजाब ३८.४० टक्के.मुस्लिम लक्षद्वीपमध्ये ९६.२०, जम्मू आणि काश्मीरमध्ये ६८.३०, आसाम ३४.२०, पश्चिम बंगाल २७.५, केरळ २६.६०, उत्तर प्रदेश १९.३० आणि बिहार १८ टक्के आहेत.