शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

हिंदोळे नात्यांचे

By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST

हिंदोळे नात्यांचे - ॲड निलिमा कानेटकर

हिंदोळे नात्यांचे - ॲड निलिमा कानेटकर

दु:स्वप्न
आइरवना नेहाला आत्याने वाढवले होते. नेहाचे वडील फिरतीच्या नोकरीवर असल्याने त्यांना नेहाला स्वत:सोबत ठेवता येत नव्हते. आत्या प्रेमळ होती ती नेहाला व्यविस्थत सांभाळत होती. कोठेच काही तक्र ार नव्हती. यथावकाश नेहा १२ वी पास झाली. तिला जास्त शिकवण्याची घरच्यांची ऐपत नव्हती तसेच ती लग्नायोग्य झाली होती. तरूण मुलगी जास्त दिवस घरी नको म्हणून आत्याने तिच्या लग्नाचा घोषा लावला. नेहाला त्या बद्दल विचारलेच नाही. तसेही नेहा अबोलच होती. तिला परिस्थितीची जाणीव असल्याने ती संकोचत असे.तिने पुढे काही प्रशिक्षण घेण्याकडे ही लक्ष दिले नाही. वडीलांना नेहाबद्दल खूप जवळीक अथवा काळजी ही नव्हती. त्यातच आत्याच्या मुलीचे कंगनाचे लग्न झाले.आता आत्याला नेहाच्या भविष्याची काळजी लागली. ती सर्वांना नेहाला स्थळे बघण्यासाठी आग्रह धरू लागली.
कंगनाच्या पतीने संतोषने व सासूने नेहासाठी करणचे स्थळ सुचवले. करणची आई कंगनाच्या सासूच्या दूरच्या नात्यात होती. घर सधन होते. करणला व्यवस्थित नोकरी होती. लग्न ठरले. साखरपुडा घाईनेच झाला. नेहा करण २ वेळा फिरायला बाहेर गेले होते. सर्वांसमोर अदबीने वागणारा करण बाहेर विचित्र वागत असे. दोघाची विशेष ओळख झाली नव्हती तरी तिच्याशी अती जवळीक साधण्याचे प्रयत्न असत. त्यातही त्याचा धसमुसेपणा असे. नेहा अस्वस्थ होत असे पण कोणाकडे सांगावे असे तिला वाटे. तिने आत्याशी बोलायचा प्रयत्न केला पण आत्याने हसण्यावारी नेले. नेहा या लग्नाच्या कल्पनेने घाबरून गेली. तिचे चांगल्या घरी लग्न ठरल्याच्या आनंदात तिची अस्वस्थता कोणाच्याच ध्यानी आली नाही. तिचे करणशी दुपारी लग्न झाले. त्याच रात्री नेहा आणि करण मधुचंद्रासाठी रवाना झाले.
आता नेहाचे दु:स्वप्न सुरू झाले. सुखी संसाराची तिची स्वप्ने पार धुुळीला मिळाली. दिवसा करण नीट वागायचा. रात्री त्याचे वागणे बदलून जायचे. प्रणयाच्या नावावर तो नेहाला शारीरीक इजा करत असे . तो नेहाच्या शरीरावर ब्लेडने जखमा करे. ती घाबरलेली बघून, तिच्या वेदना बघुन हसत असे. त्यातच त्याला विकृत आनंद वाटत होता. दिवसा आणि रात्रीच्या करणमध्ये खूप फरक होता. जसा कांही त्याच्यात एकाच वेळी दोन व्यक्ती सामावलेल्या होत्या. करण प्रत्यक्षात एक मानसिक रुग्ण होता. नेहा त्याच्या भितीने मधुचंद्राच्या काळातच आजारी पडली. तिला ताप भरला.अशा परिस्थितीत ते वेळेआधी घरी परतले.
त्या नंतर रितीप्रमाणे नेहा माहेरी आली. ती फारच भेदरलेली दिसत होती.अजूनच अबोल झाली. तापात पडून राहिली होती. नेहा खूप अशक्त झाली होती. डोळ्यातून सतत पाणी गळत होते. या काळात तिला भेटायला येण्याचे करणने टाळले. आत्याला आता काळजी वाटू लागली. अशातच एकदा आंघोळ झाल्यानंतर आत्या नेहाला कपडे घालण्यासाठी मदत करत होती. तिला नेहाच्या पाठीवर कापल्याच्या खुणा दिसल्या. तिने नीट बघितल्यावर तिच्या इतर भागंावरही तिला जखमा आढळल्या. नेहाला तिने खोदून खोदून विचारले तर नेहाचा बांधच फुटला. हळुहळू नेहाने तिचा करणच्या सहवासातील सर्व अनुभव सांगितला. आत्या घाबरून हताश झाली. दोघींनी स्वत:ला घरात कोडून घेतले. त्यातच नेहाला भेटायला कंगना आली. ती तिच्या वैवाहिक जीवनात आनंदात होती. घरातले वातावरण बघून तिला काळजी वाटली. तिने संतोषला बोलावून घेतले. संतोषने सर्व एकून घेतले पण त्याने करण विरुध्द पोलिसात तक्र ार करण्यास विरोध केला. काही तरी मार्ग काढू असा मोघम इशारा देऊन तो कंगनाला घेऊन निघून गेला. नेहाचे वडील बाहेर गावी गेले होते. त्यांचा मामा पोलिसात होता पण तोही यात्रेला गेला होता. आत्या हतबल होऊन बसून राहिली. दोघींना कसलेच भान नव्हते.
तिसर्‍या दिवशी संतोषची आई या घरी आली व तिने नेहाला सासरी पाठवण्यास सांगितले. आत्याने नकार दिला. यावर त्या बाईंनी भांडणच काढले. 'रोगी मुलगी करणच्या गळ्यात बांधली असा तिचा आरोप होता'. नेहाने जर पोलिसात तक्र ार केली तर कंगनाला कायमचे सासर सोडावे लागेल असा तिने पवित्रा घेतला. आत्याला काहीच सुचेना. तिने नेहाच्या वडीलांना बोलावून घेतले. सर्वच मंडळी काळजीत पडली. त्यांनी काही कायदेशीर कारवाई केली असती तर कंगनाचे भविष्य धोक्यात होते. त्यासाठी आत्याची तयारी नव्हती. संतोषला व त्याच्या आईला पोलिसांचा ससेमिरा नको होता. कारण हे लग्न जमवण्यात त्यांचा पुढाकार होता. शिवाय घराण्याची अब्रू जाईल असेही वाटत होते. नेहाच्या सासरच्यांना पैशाची घमेंड होतीच. कायद्याचा धाक ही नव्हता. 'नेहा लग्ना आधीपासूनच रोगी होती पण तिला मानसिक आजार ही होता व ती स्वत:ला जखमा करून घेत होती असाही तिच्या सासरच्यां नी आरोप केला'. यात्रेला गेलेला मामा लगेच परत आला. त्याने हे प्रकरण हाती घेतले. हे लग्नच फसवून झाले असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने नेहाची या लग्नातून सुटका झाली. मामाच्या प्रोत्साहनाने नेहाने शिक्षण सुरु केले. मात्र या अनुभवातून बाहेर पडण्यास नेहाला अनेक वर्षे लागली.
सहजीवन सुखाचे व्हावे, जोडीदाराच्या सहवासात पुढील आयुष्य आनंदात जावे. एक नवे कुटुंब तयार व्हावे यासाठी लग्नाचा घाट घातला जातो खरा पण त्यासाठी सर्व बाजूने आधीच चौकशी करणे काळजी घेणे हे होत नाही. विवाह पूर्व मार्गदर्शनाचा मार्ग माहित नसतो किंवा तो अवलंबला जात नाही. समस्या निर्माण झाल्यावर मात्र त्यातून बाहेर पडतांना नाकी नऊ येतात. खर्च होतोच पण संबंधितांवर आयुष्यभरासाठी कांही कटु अनुभवांचे व्रण खोलवर रहातात यावर कांही प्रतिबंधात्मक उपाय असतील का? निदान त्याचा विचार तरी योग्य वेळी करता येईल का? बघू या !!!!