शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हिमालयाच्या जैवसौंदर्यात २११ नव्या प्रजातींची भर

By admin | Updated: October 8, 2015 05:50 IST

गेल्या सहा वर्षांत हिमालयाच्या कुशीत वसलेल्या प्रदेशांमध्ये वनस्पती आणि प्राण्यांच्या २११ नव्या प्रजाती गेल्या सहा वर्षांत आढळून आल्याचे ‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर’ने

नवी दिल्ली : गेल्या सहा वर्षांत हिमालयाच्या कुशीत वसलेल्या प्रदेशांमध्ये वनस्पती आणि प्राण्यांच्या २११ नव्या प्रजाती गेल्या सहा वर्षांत आढळून आल्याचे ‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर’ने (डब्ल्यूडब्ल्यूएफ) सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. या नव्या प्रजातींमध्ये सापासारखे डोके असणारा चालणारा मासा, शिंकणारे माकड, छोटुकला गाणारा पक्षी व एक नितांतसुंदर आॅर्किड फुलाचा समावेश आहे.‘हिडन हिमालयाज : एशियाज वंडरलॅण्ड’ (हिमालयात दडलेली आशियातील नवलभूमी) या अहवालात ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ म्हणते की, ईशान्य भारत, भुतान, नेपाळ, म्यानमार आणि तिबेटचा दक्षिण भाग एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रांत पसरलेल्या हिमालयाच्या क्षेत्रांत नव्या प्रजातींचा हा जैवखजिना सापडला आहे.सन २००९ ते २०१४ या काळात सापडलेल्या या नव्या प्रजातींमध्ये वनस्पतींच्या १३३, कणाधारी प्राण्यांच्या ३९, माश्यांच्या २६, जलचरांच्या १०, सरपटणाऱ्या प्राण्याची एक, पक्ष्याची एक आणि सस्तन प्राण्याच्या एका प्रजातीचा समावेश आहे. याआधी याच हिमालयाच्या क्षेत्रांत विज्ञानास ज्ञात नसलेल्या ३५४ नव्या प्रजाती सन १९९८ ते २००८ दरम्यान आढळल्या होत्या. पृथ्वीच्या पाठीवरून सजीवांच्या अनेक प्रजाती विलुप्त होत असताना सुमारे १५ वर्षांच्या काळात एकाच भागात एवढ्या मोठ्या संख्येने नव्या प्रजाती आढळणे मोठे दिलासादायी आहे.असे असले तरी हिमालयाच्या रसरशीत जीवसृष्टीलाही वातावरण बदलाने मोठा धोका आहे. तसेच लोकसंख्या वाढ, जंगलतोड, अमर्याद गुरचरण, बेकायदा शिकार, वन्यजिवांचा व्यापार, खाणकाम, प्रदूषण आणि जलविद्युत प्रकल्पांची उभारणी यामुळेही येथील अत्यंत नाजूक निसर्ग संतुलनावर ताण वाढत असल्याचेही या अहवालात अधोरेखित केले गेले आहे.या क्षेत्रातील वन्यजीवांचा जेमतेम २५ टक्के मूळ अधिवास आता शिल्लक राहिला आहे, असे नमूद करून अहवाल म्हणतो की, पर्यावरण ऱ्हासाची पुरेशी दखल न घेता अनुसरला जाणारा सध्याचाच विकासाचा मार्ग यापुढेही अनुसरायचा की अधिक शाश्वत व निसर्गस्नेही विकासाची कास धरायची हे सरकारने ठरवायचे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)काही विस्मयकारी प्रजातीसापासारखे डोके असणारा नवा मासा. ठिकाण पश्चिम बंगाल. हवेत श्वास घेऊ शकतो, जमिनीवर चार दिवसांपर्यंत राहू शकतो व हल्लेखोराचाही फडशा पाडतो.नवा पक्षी- ठिपकेदार रेन-बॅबलर. ठिकाण-ईशान्य भारत. छोट्याशा शेपटीसह लांबी १० सेंमी. बाहेरून विटकरी व पोटाकडे पांढरा. आकाराच्या मानाने खूपच मोठ्या आवाजात गातो.शिंकणारे माकड. ठिकाण म्यानमार. नाकात पावसाचे पाणी गेल्यावर शिंकते. हा त्रास होऊ नये म्हणून पावसात गुडघ्यात डोके घालून बसते.करड्या निळसर रंगाचा नवा बेडूक. ठिकाण-अरुणाचल प्रदेश. लांबी ४७ मिमी.