शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी ‘अम्मां’कडून स्फूर्ती घेऊनच!

By admin | Updated: August 2, 2016 23:08 IST

चेन्नई: तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यापासून स्फूर्ती घेऊन अमेरिकेत हिलरी क्लिंटन यांनी तेथील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचे ठरविले

अण्णाद्रमुक आमदाराचा दावा : जयललितांचे गुणगानचेन्नई: तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यापासून स्फूर्ती घेऊन अमेरिकेत हिलरी क्लिंटन यांनी तेथील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचे ठरविले, असा अफलातून दावा अण्णा द्रमुक पक्षाच्या एका आमदाराने मंगळवारी केला.सत्ताधारी अण्णाद्रमुकचे कन्नूरचे आमदार ए. रामू विधानसभेत म्हणाले की, अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या हिलरी क्लिंटन या पहिल्या महिला आहेत. त्यामुळे पुरुषप्रधान क्षेत्रात स्त्रीने घेतलेली गरुडझेप म्हणून संपूर्ण जगात क्लिंटन यांचे कौतुक होत आहे. पण क्लिंटन यांच्या उमेदवारीमागे ‘अम्मा’ हेच एकमेव कारण आहे, असे मी गौरवाने नमूद करू इच्छितो. हिलरी क्लिंटन याआधी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री असताना जुलै २०११ मध्ये भारत भेटीवर आल्या होत्या. त्यावेळी २० जुलै रोजी चेन्नईत त्यांची आणि मुख्यमंत्री जयललिता यांची तासभर भेट झाली होती.या भेटीचा संदर्भ देत रामू म्हणाले की, आज संपूर्ण जग त्या ऐतिहासिक भेटीचे गुणगान करीत आहे. त्या भेटीत हिलरी क्लिंटन यांना ‘अम्मां’च्या व्यक्तिमत्वाची जवळून ओळख झाली व ‘अम्मां’चे इंग्रजीवरील प्रभुत्व पाहून व त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाने हिलरी थक्क झाल्या. ‘अम्मां’च्या आश्वासक संभाषणातून स्फूर्ती घेऊन अमेरिकेला परतलेल्या हिलरी आज तेथील राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार झाल्या आहेत. त्यामुळे हिलरी यांच्या उमेदवारीमागे ‘अम्मा’ हेच एकमेव कारण आहे, हे आवर्जून नमूद करायला हवे! रामू यांचे हे भाषण ऐकायला जयललिता स्वत: विधानसभेत हजर होत्या. पण त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.हिलरी क्लिंटन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर जयललिता यांनी पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले होते. अमेरिकेतील दोनपैकी एका प्रमुख राजकीय पक्षातर्फे राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी तुम्हाला मिळणे ही गोष्ट सर्व जगातील व खास करून लोकशाहीवादी देशांमधील तमाम स्त्रियांसाठी अत्यंत अभिमानाची व समाधानाची आहे, असे जयललिता यांनी त्या पत्रात नमूद केले होते. (वृत्तसंस्था)-------------व्यक्तिपूजेची परिसीमाराजकारणात कार्यकर्ते आणि अनुयायांनी नेत्याचे लांगुलचालन करणे अभिप्रेतच असते. अण्णा द्रमुकसारख्या व्यक्तिकेंद्रित पक्षात तर असे लांगुलचालन हेच भाग्योदयाचे भांडवल ठरते. तरीही कन्नूरचे आमदार ए. रामू यांनी वरील दावा करून व्यक्तिमहात्म्याची परिसीमा गाठली, असेच म्हणावे लागेल. रामू हे पक्षात दोनच वर्षांपूर्वी आले आहेत व ही त्यांची पहिलीच आमदारकी आहे.