शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्य भारतात आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सर्वाधिक

By admin | Updated: May 15, 2016 04:22 IST

भारतात आंतरजातीय विवाहांना सहजासहजी मान्यता मिळत नाही, तसा विवाह करणाऱ्यांना नातेवाईक स्वीकारायला तयार होत नाहीत, अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात.

नवी दिल्ली : भारतात आंतरजातीय विवाहांना सहजासहजी मान्यता मिळत नाही, तसा विवाह करणाऱ्यांना नातेवाईक स्वीकारायला तयार होत नाहीत, अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. जाती व धर्माच्या अभिमानापायी कित्येक पालकांनी आपल्या पोटच्या मुलाची वा मुलीचीच हत्या केल्याच्या आॅनर किलींगच्या घटनाही प्रसिद्ध होत असतात. पण आपल्याच देशात असे एक राज्य आहे जिथे सर्वात जास्त म्हणजे ५५ टक्के आंतराजातीय विवाह होतात. ते राज्य आहे मिझोरम.अलीकडेच प्रदिर्शत झालेला सैराट चित्रपट खूप गाजत असून, त्यातील आंतरजातीय विवाहाच्या मुद्द्यावरूनही घराघरांत आणि सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. ईशान्यकडील राज्यांमध्ये आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण अधिक आहे. अगदी जम्मू-काश्मीरमध्येही अशा विवाहांचे प्रमाण खूप मोठे आहे.इंडियन ह्युमन डेव्हलपमेंटने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील ३३ राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ४१ हजार ५५४ कुटुंबाचा समावेश होता. नॅशनल कौन्सिल आॅफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या (एनसीएईआर) सर्वेक्षणानुसार भारतात फक्त ५ टक्के आंतरजातीय विवाह होतात. भारतासारख्या बहुधर्मीय व हजारो जाती असलेल्या देशात ९५ टक्के लग्न ही स्वजातीतच केली जातात. (लोकमत न्यूज नेटवर्क)> मिझोरममील बहुसंख्य नागरिक ख्रिश्चनधर्मीय असून तिथे तब्बल ५५ टक्के तरुण-तरुणी आंतरजातीय विवाह करतात. या क्र मवारीत दुसऱ्या क्र मांकावर आहे मेघालय हे राज्य. तिथे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण आहे ४६ टक्के आहे आणि सिक्कीम तिसऱ्या स्थानावर असून, तिथे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण ३८ टक्के आहे. मुस्लिमबहुल जम्मू-काश्मीर राज्य चौथ्या क्रमांकावर असून, तिथे ३५ टक्के विवाह आंतरजातीय होतात. गुजरात पाचव्या स्थानावर आहे. तिथे आंतरजातीय लग्नाचे प्रमाण १३ टक्के आहे.