शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भारतात जन्मले सर्वाधिक वजनाचे बाळ!

By admin | Updated: May 27, 2016 04:34 IST

नंदिनी नावाच्या १९ वर्षे वयाच्या मातेने येथील सरकारी इस्पितळात गेल्या सोमवारी ६.८ किलो (सुमारे १५ पौंड) वजनाच्या मुलीला जन्म दिला. सर्वसाधारणपणे नवजात बाळांचे

हसन (कर्नाटक) : नंदिनी नावाच्या १९ वर्षे वयाच्या मातेने येथील सरकारी इस्पितळात गेल्या सोमवारी ६.८ किलो (सुमारे १५ पौंड) वजनाच्या मुलीला जन्म दिला. सर्वसाधारणपणे नवजात बाळांचे वजन ३.४ किलो असते. याहून दुप्पट वजनाची आणि आकाराने सहा महिन्यांच्या बाळाएवढी असणारी ही मुलगी जगातील सर्वाधिक वजनाचे बाळ असल्याचे मानले जात आहे.या चमत्कारी मुलीला जन्म देणारी नंदिनी स्वत: ९४ किलो वजनाची व ५ फूट ९ इंच उंचीची आहे. सिझेरियन शस्त्रक्रियेने तिला जन्माला घालण्यात आले. ही नवजात मुलगी पूर्णपणे सुदृढ असून, तिच्यात कोणताही जन्मजात दोष आढळलेला नाही. तरीही आणखी काही दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर बाळ-बाळंतिणीस घरी सोडले जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले.नंदिनीची प्रसूती शस्त्रक्रिया करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूर्णिमा मनू यांनी सांगितले की, नंदिनी प्रसूतीच्या काळात चेक-अपसाठी नियमितपणे यायची तेव्हा तिला एवढे मोठे बाळ होईल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे जन्माला आलेल्या मुलीचा आकार व वजन पाहून आम्हाला आश्चर्य वाटले.डॉ. मनू म्हणाल्या की, जन्मलेल्या मुलीचे साखरेचे प्रमाण व थायरॉईड ग्रंथीचे कार्य उत्तम आहे. आकार आणि वजन सर्वसाधारण बाळांच्या तुलनेत दुप्पट असले तरी तिला श्वसनाचा कोणताही त्रास नाही. इस्पितळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्यंकटेश राजू म्हणाले की, माझ्या २५ वर्षांच्या डॉक्टरी पेशात आकाराने व वजनाने एवढे मोठे बाळ जन्माला आलेले मी पाहिलेले नाही. जागतिक विक्रमाची अपेक्षागेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फिर्दोस खातून या महिलेने जन्माला घातलेला ६.७ किलो (१४.७७ पौंड) वजनाचा मुलगा हे आजवरचे भारतात जन्मलेले सर्वाधिक वजनाचे बाळ होते. नंदिनीच्या मुलीने या मुलाला आता मागे टाकले आहे.गिनीज बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार कॅनडातील अ‍ॅना बेट्स या महिलेने सन १८७९मध्ये जन्माला घातलेले २३ पौंड १२ औंस वजनाचे बाळ हे आजवरचे सर्वाधिक वजनदार बाळ आहे. मात्र या बाळाचा जन्मानंतर अवघ्या ११ तासांत मृत्यू झाला होता.तीनच आठवड्यांपूर्वी आॅस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात झैद कॅडिक हा ६ किलो वजनाचा मुलगा जन्माला आला होता. अमेरिकेत मॅसॅच्युसेट्स शहरात सन २०१४मध्ये जन्मलेल्या कॅरिसा रुसाक हिचे वजन ६.५ किलो होते.