शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस पद्धतीने पोलिसच चालवत होता हाय-टेक सेक्स रॅकेट

By admin | Updated: April 24, 2017 21:16 IST

कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यावर काय होईल? असे प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत.

ऑनलाइन लोकमतबंगळुरु, दि. 24 - बंगळुरुतील एक पोलीस हेड कॉन्स्टेबलला सेक्स रॅकेटच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यावर काय होईल? असे प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत. अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव करीबसप्पा असे आहे. हा हेड कॉन्स्टेबल ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवत होता. यात त्याने कॅशलेस व्यवहार करण्याची स्मार्ट पद्धतही अवलंबली होती. अशी माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात एका मिको लेआऊटमधील घरावर छापा टाकत पोलिसांनी हे हाय-टेक रॅकेट उध्वस्त केले. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली. शिवाय स्वाइप मशीन आणि मोठी रोकडही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.करीबसप्पा हा परप्पन अग्रहरा पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत होता. हाय-टेक सेक्स रॅकेटच्या या व्यवसायात तो इतर दोन दलालांकडून नफ्याचा हिस्सा मिळवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे दोन दलाल कोण आहेत, याबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली आहे.करीबसप्पाला कोर्टात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या तो अग्रहरा मध्यवर्ती कारागृहात आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.