पाटणा : बिहारमधील राजकीय संकट लक्षात घेता पाटणा उच्च न्यायालयाने राज्यातील जितन राम मांझी सरकारला दैनंदिन व्यवहारवगळता आर्थिक प्रभाव टाकणारे कुठलेही निर्णय घेऊ नका, असे आदेश सोमवारी दिले.न्यायमूर्तीद्वय इकबाल अहमद आणि समरेंद्र प्रतापसिंग यांच्या खंडपीठाने विधान परिषदेतील संयुक्त जनता दलाचे सदस्य नीरजकुमार यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना उपरोक्त आदेश दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १९ फेब्रुवारीला होईल. कुमार यांचे वकील व माजी महाधिवक्ता पी.के. साही यांनी अल्पमतातील मांझी सरकारतर्फे घेतल्या जात असलेल्या धोरणात्मक निर्णयांकडे लक्ष वेधले होते. (वृत्तसंस्था)
मांझी सरकारला हायकोर्टाचा झटका
By admin | Updated: February 17, 2015 02:28 IST