शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीसह देशात हाय अलर्ट !

By admin | Updated: January 26, 2016 03:27 IST

देशभरात आज (मंगळवारी) साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी अभूतपूर्व सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नवी दिल्ली : देशभरात आज (मंगळवारी) साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी अभूतपूर्व सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पठाणकोट हवाईतळावर झालेला हल्ला आणि त्यानंतर इसिस आणि अल-कायदासारख्या संघटनांचे नेटवर्क उधळून लावण्यासाठी सुरक्षा संस्थांनी चालविलेल्या धाडसत्राच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ड्रोनहल्ल्यांचा धोका पाहता दिल्लीलगतच्या राज्यांवरही नजर ठेवली जात आहे. राजपथाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.देशाच्या सर्व राज्यांत, विशेषत: सर्व महानगरांमध्येही हाय अलर्ट असून, सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा दलही तैनात करण्यात आले आहे. विमानतळे, रेल्वे स्थानके तसेच गर्दीची सर्व ठिकाणे या ठिकाणी दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई विमानतळ २ फेब्रुवारी रोजी उडवून देण्याच्या धमकीमुळे तिथे कडेकोट बंदोबस्त आहे. शिवाय इसिसचे समर्थक आणि संशयित ज्या राज्यांतून पकडण्यात आले, तिथे विशेष अलर्ट आहे. इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपात देशभरात अटक करण्यात आलेल्या १२ संशयित दहशतवाद्यांना येथील विशेष न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या (एनआयए) कोठडीत पाठविले. (वृत्तसंस्था)पठाणकोटमध्ये चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि सर्वच शासकीय इमारतींच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. प्रजासत्ताकाचा मुख्य कार्यक्रम असलेल्या काश्मीरच्या श्रीनगरमधील बक्षी स्टेडियमवर पोलिसांनी शक्तिप्रदर्शन करीत कडक बंदोबस्त ठेवला आहे.