शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आत्मघाती हल्ल्याचा देशभरात हाय अ‍ॅलर्ट

By admin | Updated: October 1, 2016 03:59 IST

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाइक्सनंतर नवी दिल्ली, मुंबई आणि सर्व महानगरांसह देशभर हाय अ‍ॅलर्ट घोषित करण्यात आला असतानाच, पुढील तीन ते चार दिवस

- हरीश गुप्ता/ शीलेश शर्मा /सुरेश डुग्गर, नवी दिल्ली

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाइक्सनंतर नवी दिल्ली, मुंबई आणि सर्व महानगरांसह देशभर हाय अ‍ॅलर्ट घोषित करण्यात आला असतानाच, पुढील तीन ते चार दिवस निर्णायक असू शकतात, या शक्यतेमुळे संरक्षण खाते आणि केंद्रीय गृह खाते सक्रिय झाले असून, या काळात सर्व राज्यांना दक्षतेच्या व खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमेवरील भागांत आणि गावांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून, भारतीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलांची जागा लष्कराने घेतली आहे.पाकिस्तानकडून थेट युद्धाची शक्यता नसली तरी काही कारवाया होण्याची शक्यता लक्षात घेत, पाकच्या कोणत्याही कारवायांना तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्या आहेत. त्यांनी शुक्रवारी सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतला आणि सीमेवरील भागांत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती करून घेतली. सीमेवरील गावे रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी शेती, जनावरे यांना सोडून लोक अन्यत्र स्थलांतर करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. महिला, मुली व लहान मुले यांना मात्र अन्यत्र स्थलांतर करण्यास भाग पाडण्यात आले असून, ठिकठिकाणी त्यांच्यासाठी (पान ११ वर) आता आम्ही भारतात घुसून हल्ला करूभारताने केलेली कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राइक असल्याचे सांगण्यात येत असले तरी खरे सर्जिकल स्ट्राइक आम्ही भारतात घुसून करून दाखवू, अशी धमकी सईद हफिज याने दिली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय, पाक लष्कर वा तेथील सरकार यांच्या सहकार्य व मदतीशिवाय तो काही करू शकत नाही. त्यामुळे तो जे बोलला, त्याला पाकिस्तानचीच फूस असावी, असा अंदाज आहे. आता सर्जिकल स्ट्राइक करण्याची संधी आम्हाला आहे आणि तुम्हाला अमेरिका वा कोणताही देश मदत करणार नाही, हे लक्षात ठेवा, अशी धमकीच त्याने दिली आहे.गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवादेशभर उद्या, शनिवारपासून नवरात्रौत्सव सुरू होत असल्याने रेल्वे स्टेशन्स, मार्केट्स, महत्त्वाची व संवेदनशील आस्थापने, कार्यालये, धार्मिक तसेच पर्यटन स्थळे अशा सर्व गर्दीच्या ठिकाणी कोणतीही गडबड होता कामा नये याची काळजी घेण्यास राज्य सरकारांना सांगण्यात आले आहे.मोदींची पंतप्रधानांसारखी पहिली कृती : सर्जिकल हल्ला केल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली. मोदींनी अडीच वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधानपदाला साजेशी कृती केली. जेव्हा पंतप्रधान देशाचे पंतप्रधान म्हणून काम करतात तेव्हा मीदेखील त्यांचे समर्थन करतो, असे ते म्हणाले