शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

संघाचे मुख्यालय होणार हायटेक

By admin | Updated: September 6, 2016 03:46 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघही काळाबरोबर बदलू पाहत आहे.

नितीन अग्रवाल,

नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघही काळाबरोबर बदलू पाहत आहे. दिल्लीतील केशवकुंज या कार्यालयाचे भव्य इमारतीत रूपांतर करण्याची तयारी सुरू झाली आहे. अर्थातचे हे नवे कार्यालय हायटेक असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ आॅक्टोबर रोजी नव्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. संघाने नव्या गणवेशासाठीही विजयादशमीचाच मुहूर्त निश्चित केला आहे. विजयादशमीला नागपुरात कार्यक्रम असतात, त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती राहण्याची शक्यता कमी आहे; पण भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी संघाचे सह कार्यवाह भैयाजी जोशी उपस्थित राहणार आहेत. संघाच्या या नव्या इमारतीत आधुनिक ग्रंथालय, मीडिया आणि सभागृह असणार आहे. संघाशी संबंधित सर्व संस्थांना केशवकुंजमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल. यात प्रामुख्याने संघाचे मुखपत्र पांचजन्य आणि आॅर्गनायझर हे प्रकाशन, सुरुचि प्रकाशन, संस्कृतभारती, सेवाभारती, भारतीय इतिहास संकलन समिती यांचा समावेश आहे. याशिवाय संघाच्या आंतरराष्ट्रीय विभागाशी संबंधित संघटनांनाही येथे जागा असेल. गडकरी यांच्या काळातील योजना असे सांगितले जाते की, नितीन गडकरी हे भाजपाध्यक्ष असताना त्यांनी केशवकुंजच्या नव्या इमारतीसाठी प्रस्ताव दिला होता. याला नागपूर मुख्यालयातून मान्यता मिळाली होती. >झपाट्याने झाला विस्तारसंघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना समर्पित हे दिल्लीतील मुख्यालय पाच दशकांहून अधिक काळापासून येथे आहे. अडीच एकरांत याचा विस्तार आहे. संघटनेचा विस्तार आणि मजबुती यासाठी आधुनिकीकरणावरही भर दिला जात आहे. पुण्यात १९२५ मध्ये स्थापन झालेल्या संघाने गत काही वर्षांत वेगाने प्रगती केली आहे. २०१० मध्ये ४० हजार शाखा असलेल्या संघाच्या आता ५७ हजार शाखा आहेत.