शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी विधेयकही मंजूर करायला मदत करा आणि श्रेय घ्या, जेटलींचा राहुल गांधींना टोमणा

By admin | Updated: March 9, 2016 11:48 IST

वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) मंजूर करण्यास राहुल गांधींनी मदत करावी आणि त्याचही श्रेय घ्यावं असं म्हणत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना टोमणा मारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ९ - वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) मंजूर करण्यास राहुल गांधींनी मदत करावी आणि त्याचही श्रेय घ्यावं असं म्हणत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना टोमणा मारला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील (ईपीएफ) कर मी टाकलेल्या दबावामुळे मागे घेतले असं वक्तव्य राहुल गांधांनी केलं होतं
 
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी लोकसभेत  कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (ईपीएफ) रक्कम काढल्यावर कर लावण्याच्या प्रस्ताव सरकार मागे घेत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर भाजपा आणि काँग्रेसमध्ये श्रेययुद्ध सुरु झाले. राहुल गांधींनी मी टाकलेल्या दबावामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हणत श्रेय घेतलं होतं. ज्यावर टीका करत संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू यांनी राहुल गांधी महत्वाची विधेयक अडवून गरिबांना दुखवत आहेत असं म्हणल होत. 
 
अरुण जेटली यांनी ईटीव्ही नाऊला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसने सत्तेत असताना गरिबांसाठी सामाजिक सुरक्षा निर्माण करण्यासाठी काहीच केलं नसल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी सर्व श्रेय घेऊ शकतात. जीएसटी आणि इतर महत्वाची विधेयक मंजूर करण्यास त्यांनी मदत करावी आणि त्यांचंही श्रेय घ्याव. त्यांनी संसदेच्या कामात अडथळा आणू नये. ही विधेयक भाजपाची नसून देशाची आहेत असं अरुण जेटली बोलले आहेत.